ग्रेटा थनबर्ग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

    18-Feb-2021
Total Views |

greta thenburg_1 &nb



नासाच्या मंगळ मोहिमेवर भडकली आणि टीका करताना म्हणाली...

 
 
 
स्टॉकहोम: केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे टूल किट शेअर केल्याने स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही सध्या भारतामध्ये चर्चेत आहे. आणि आता ती एका नव्या वादात सापडली आहे.
 
 
 
 
ग्रेटा हिने थेट नासाच्या मंगळ मोहिमेवर टीका केली आहे. या मोहिमेला टीकेचे लक्ष्य करताना ग्रेटाने मंगळ ग्रहावरील पर्यटनाची एक जाहीरात शेअर केली आहे. आणि त्यावर ती म्हणाली की, आपली पृथ्वी वातावरणातील बदलांचा सामना करत आहे. मात्र दुसरीकडे सरकारं आणि अंतराळ संस्था अन्य ग्रहांच्या प्रवासावर अब्जावधी रुपये खर्च करत आहेत.
 
 
 
 
त्यामुळे आता पुन्हा एकदा ग्रेटाने केलेल्या या वक्तव्यामुळे ती अडचणीत सापडली आहे. शिवाय या मंगळ मोहीमेवर केलेल्या टीकेमुळे वेगळा वाद होण्याची आणि ग्रेटा पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या टीकेची धनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.