डोंबिवलीत महिला सक्षमीकरण व कौशल्य वर्ग प्रशिक्षण शिबीर संपन्न
डोंबिवली : दत्ताेपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण आणि विकास बोर्ड क्षेत्रीय निर्देशालय मुंबई, (श्रम आणि रोजगार मंत्रलय, भारत सरकार) प्रादेशिक संचालनालय,मुंबई विभाग आणि सुजित महाजन व रु पाली महाजन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महिला सक्षमीकरण व कौशल्य वर्ग प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या शिबीराला महिलांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील स्वामी विवेकानंद शाळेच्या आवारात नुकतेच हे शिबीर पार पडले. हे शिबीर प्रभाग क्रमांक 58 मधील महिला सहभागी झाल्या होत्या. या शिबीराचा तीनशे महिलांनी लाभ घेतला. या शिबीरात श्रम आणि रोजगार मंत्रलय भारत सरकार प्रादेशिक संचालक (प्रभारी) चंद्रसेन जगताप, कामगार शिक्षक चंद्रकांत खोत, सामाजिक कार्यकत्र्या निवेदिका जोशी, महिला उद्योजिका आशिया रिझवी, भाजपा डोंबिवली (प.) मंडल ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुजित महाजन, रूपाली महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
महिं बचतगट, केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय योजना, आरोग्य, व्यसनमुक्ती, महिलांना कायदेशीर जनजागृती, योगा, एकाग्रता, प्राणायाम आदीची माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली. श्रममंत्रलयातर्फे शिबीरात उपस्थित प्रत्येक महिला लाभाथ्र्याना दोन दिवसीय शिबीराचे चारशे रु पये देण्यात येणार आहे.सुजित महाजन म्हणाले, महिलांसाठी कार्यक्रम राबवावा असा विचार मनात आला होता. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक कार्यक्रम आपण नेहमीच घेत असतो. पण महिलांना बचतगट,गृहउद्योग, महिला सुरक्षा याविषयी माहिती व्हावी या उद्देशाने शिबीराचे आयोजन केले होते.
---------------------------------------------------------------