म्यानमारमध्ये 'इमर्जन्सी': राष्ट्रप्रमुखांना सैन्याकडून अटक

    01-Feb-2021
Total Views |

myanmar _1  H x


राष्ट्रनेत्या आंग सान सू यांना अटक

 
 
म्यानमार - म्यानमारची सत्ता पुन्हा एकदा सैन्याने आपल्या हातात घेतली आहे. मान्यमारमद्ये लोकशाहीची चळवळ उभ्या करणाऱ्या नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू यांना सैन्याने ताब्यात घेतले आहे. सैन्यदलाने देशात वर्षभरासाठी आपतकालीन परिस्थिती जाहीर केली असून प्रशासनाची सूत्र आपल्या हातात घेतली आहे.
 
 
म्यानमारामध्ये आज सकाळी सैनदलाने आपतकालीन परिस्थिती लागू करुन सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे अटक सत्र सुरू केली आहेत. आज सकाळी म्यानमारच्या राष्ट्रीय नेत्या आंग सान सू, राष्ट्रपती विन मिंट आणि सत्ताधारी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना सैन्यदलाने ताब्यात घेतले आहे. म्यानमारमध्ये लोकशाहीचे बीज रोवणाऱ्या ७५ वर्षांच्या आंग सान सून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत. त्यांना शांततेसाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सैन्यासोबत असलेला त्यांचा वाद विकोपाला गेला होता.
 
 
म्यानमारमधील नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी / एनएलडीच्या प्रवक्त्यांनी आज माहिती देताना सांगितले की, सरकार आणि शक्तिशाली सैन्यामधील वाढत्या तणावामुळे सैन्यदलाने हे पाऊल उचलले आहे. देशातील परिस्थितीवरून हे स्पष्ट झाले आहे की, सेना सैन्यदलाची घुसखोरी करीत आहे. म्यानमारच्या राजकीय पेचप्रसंगावर भारताची बारीक नजर आहे. यासंदर्भात भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी ते या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सराकारच्या अधिकृत दूरचित्रवाणी वाहिनीचे प्रसारण बंद करण्यात आले असून इंटरनेटवरही परिणाम झाला आहे. देशातील प्रमुख राज्यांमध्ये सैन्याने आपल्या तुकड्या तैनात केल्या आहेत. कॅरेन राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर स्थानिक नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकांबद्दल सैन्यदल हे असमाधानी होते. याचा परिणाम असा झाला की, ऑंग सॅन सू यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळविला. मात्र, निवडणूकीमध्ये गौडबंगाल झाल्याचा आरोप सैन्यदलाने लावला होता. तेव्हापासून सरकार आणि सैन्यात वाद सुरू होता.
 
 
१९४८ साली म्यानमारला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर या देशाने १९६२ आणि १९८८ साली दोन सत्ताधीश पाहिले आहेत. दशकापूर्वीपर्यंत म्यानमारवर फक्त लष्करी शासन होते आणि हे लष्करी शासन जवळजवळ ५० वर्षांपासून कायम होते. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एनएलडीने मोठा विजय मिळविला. मात्र, त्याकडेही संशयाच्या नजरेने पाहिले गेले. अशा परिस्थितीत संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या आधीच सैन्याने पुन्हा एकदा बंड करुन सत्ता आपल्या हातात घेतली आहे.