संजय राऊतांच्या विधानावर भाजप आक्रमक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2021   
Total Views |
 
bjp corporators_1 &n
 
 
 
मुंबई : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि भाजपच्या नेत्यांबाबत केलेल्या असभ्य विधानावरून भाजप नगरसेविकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. गुरुवार, दि. ९ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या राजकीय नाट्यानंतर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, आ.आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजपच्या नगरसेविका शितल सुरेश गंभीर देसाई यांनी मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.
 
 
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवारांना बसायला दिलेली खुर्ची आणि त्यावरून राज्यातील राजकारणात मोठी चर्चा सुरु झाली होती. तसेच भाजपच्या नेत्यांनीही राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांवर टीका करताना संजय राऊत यांचा तोल ढळला आणि एका असभय शब्दाचा वापर राऊत यांनी यावेळी केला. दरम्यान, भाजपच्या नेत्यांविरुद्ध संजय राऊत यांनी केलेल्या या विधानाचा भाजपतर्फे गुरुवारी कठोर शब्दांत निषेध करण्यात आला. तसेच भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने या विरोधात मोठ्या प्रमाणात नारेबाजी देखील करण्यात आली.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@