चीनमधले ‘सिनीसायझेशन!!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2021   
Total Views |

CHINA_1  H x W:
 
 
धर्माचे ‘सिनीसायझेशन’ करण्याचे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे म्हणणे आहे. नुकतीच चीनमध्ये धार्मिक कार्यासंदर्भातली राष्ट्रीय परिषद झाली. त्यामध्ये शी जिनपिंग यांनी ही भूमिका मांडली. ‘सिनीसायझेशन’ म्हणजे चीनमध्ये अस्तित्वात असलेल्या सगळ्या धर्मांमध्ये चीनच्या संस्कृतीनुसार बदल घडवणे. हे का? तर देशात सगळे धर्म चीनी संस्कृतीनुसार बदलवले, तर देशात राष्ट्रनिष्ठा वाढीस लागेल असे या कम्युनिस्ट सत्ताधाऱ्यांचे आणि पर्यायाने त्यांच्या सत्ताधारी पक्षाचे मत आहे. चीनमधल्या सगळ्या धर्मांनी एका संस्कृतीत एका संदर्भात यायला हवे यासाठी चीनी सरकार काम करणार आहे. इतकेच नव्हे, तर ऑनलाईन धार्मिक प्रसाराचे जे काम चालते त्यालाही चीनी सरकार नियंत्रित करणार आहे. थोडक्यात सगळ्या धर्माचे चीनीकरण करण्याचे ध्येय शी जिनपिंग आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाचे आहे.
 
 
२०१६ सालीही अशीच परिषद चीनमध्ये झाली होती. त्यानंतरच्या काळात चीनमध्ये उघुर मुसलमान आणि त्यासंदर्भातल्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाच्या झाल्या. उघुर मुसलमानांवर चीनी प्रशासन कसे अत्याचार करते? त्यांना कशी अमानवीय वागणूक दिली जाते. त्यांच्यासाठी कशी बंदिस्त वस्ती बनवली गेली. त्यांना चीनी समाजरितीचे शिक्षण देण्यासाठी चीनी प्रशासनाने कशी वेगळी व्यवस्था लावली, या व्यवस्थेच्या माध्यमातून उघुर मुसलमानांवर कशी दडपशाही केली जाते, एक ना अनेक बातम्या. उघुर मुसलमांनावर होणाऱ्या अत्याचाराची दखल अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली, तर २०१६ नंतर आता पुन्हा चीनमध्ये धार्मिक कार्यासंदर्भातली परिषद घेण्यात आली. चीनमधल्या या धार्मिक परिषदेची व्याप्ती आणि अर्थ याचा मागोवा घेताना जाणवते की, चीनी सरकारने २०१९ साली एक श्वेतपत्रिका जारी केली. त्यामध्ये देशात मूळ चीनी संस्कृती व्यतिरिक्त कोणते कोणते धर्म आहेत याची तपशीलवार माहिती दिली होती. त्यानुसार चीनमध्ये इतर धर्मीय म्हणजे मुळ चीनमध्ये २० कोटी बौद्ध त्यातही तिबेटच्या बौद्धधर्मियांची संख्या जास्त आहे. दोन कोटी मुस्लीम आहेत. ३.८ कोटी प्रोटेस्टंट ख्रिश्चन आणि ६० लाख कॅथॉलिक ख्रिश्चन आहेत. या सगळ्यांचे मिळून १,४०,००० पुजास्थळ आहेत. यामध्ये छोट्या प्रार्थनास्थळांचा समावेश नाही. तर जागतिक अभ्यासकारांचे मत आहे की, २०१९ साली चीनी प्रशासनाने ही श्वेतपत्रिका जाहिर केली. त्याआधी प्रशासनाने सर्वेक्षण केले. अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने धर्मवार लोकांची माहिती गोळा केली. हे सगळे कशासाठी तर २०२१ सालच्या चीनमध्ये झालेल्या या धार्मिक परिषदेमध्ये ठोस भूमिका घेण्यासाठी. चीनी प्रशासनाला धर्माचे सांस्कृतिक एकीकरण करायचे नाही, तर धर्माचे कम्युनिस्टीकरण करायचे आहे. हे कम्युनिस्टीकरण म्हणजे काय तर? राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या सत्तेला अनुकुलित करायचे आहे. प्रत्येक धर्माची आपली धारणा असते. आपआपले मूळ प्रथा रितीरिवाज असतात. नियमही असतात. श्रद्धा असतात. या सगळ्या धर्मांनी ‘सिनीसायझेशन’च्या प्रक्रियेत सामावायचे म्हणजे काय? तर चीनच्या सत्ताधाऱ्यांना जे अपेक्षित आहेत ते ते बदल करायचे.
 
 
चीनच्या एकंदर भूतकाळात हे नवीन नाही. ड्रॅगन, डायनॉसोर म्हणून ओळख असलेल्या चीनमध्ये नेहमीच दुसऱ्या धर्मावर, दुसऱ्या विचारांवर दडपशाही लादण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. चीनमध्ये ‘सिनीसायझेशन’मुळे बौद्ध, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांवर बंधने लादली जाणार आहेत. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड देशाला तोडू पाहणारे आझादी वगैरे बरळत असतात. ते बहुसंख्य डाव्या विचारसरणीचे असतात. देशात कम्युनिस्टांची सत्ता यावी असे यांना मनेामन वाटते. यातले काही तर चीनला कम्युनिस्ट राजवट आहे म्हणून आपला आदर्श देशही मानतात. इतकेच काय? भारतातून तिथे बौद्ध धर्म गेला आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध धमीर्र्य आहेत. त्यामुळे बौद्ध धर्मियांसाठी चीन अतिशय अनुकूल देश आहे असेही हे लोक आडून आडून बोलतात. मात्र, आता या सगळ्या कम्युनिस्टांचे मायबाप असलेल्या शी जिनपिंग सरकारने बौद्ध, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माचे ‘सिनीसायझेशन’ करण्याचा घाट घातला. तर यावर ही मंडळी काही बोलतील का? ‘डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’सारख्या परिषदा घेणारे लोक आता ‘डिस्मॅन्टलिंग सिनीसायझेशन’ विषयावर परिषदा घेतील का? नाही घेणार. कारण चीनी कम्युनिस्ट विचारसरणीत विचारांचा विरोध विचार नसतो, तर विचारांचा विरोध मृत्युच असतो. त्यामुळे चीनमध्ये धर्मांचे ‘सिनीसायझेशन’ होणारच हे नक्की...
 
 
@@AUTHORINFO_V1@@