लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या अपघातावरून;विराट कोहली ट्रोल का झाला?

    08-Dec-2021
Total Views |

vk_1  H x W: 0  



नवी दिल्ली  :
  तमिळनाडूच्या कुन्नूर प्रदेशात जनरल बिपिन रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टर अपघाताचे वृत असताना विराट कोहलीच्या पीआर व्यवस्थापकांनी कोहलीच्या ट्विटर अकाउंटवर त्याचा खोट्या मोटार सायकलवरील विनोदी असा फोटो शेअर केला आहे. यावरून विराट कोहली पुन्हा एकदा ट्रोल होत आहे.


तथापि, हे सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवडलेले दिसून येत नाही आहे , भारताच्या लष्करप्रमुखाच्या आरोग्याबाबत चिंता दर्शविण्याच्या वेळेस कोहली विनोदी फोटो टाकतो मात्र लष्करप्रमुखाबद्दल चिंता वर्तवत नाही. या गोष्टीचा सोशल मिडिया वापरकर्त्यांना प्रचंड राग आलेला आहे.




“प्रसंग बघा आणि कोहलीची पोस्ट पहा,” चिडलेल्या सोशल मीडियाने वापरकर्त्याने कोहलीच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली.



 
दुसर्‍या संतप्त ट्विटर वापरकर्त्याने विराट कोहलीची निंदा केली आणि असे म्हटले की त्याला हेलिकॉप्टर अपघातावर ट्विट करण्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु असंबद्ध ट्विट पोस्ट करण्यासाठी वेळ मिळाला.




तर अजून एका वापरकर्त्याने पीआर टीमला काढून टाकण्याचा सल्ला दिला.



“सीडीएस बिपिन रावत यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि इथे तुम्ही तुमच्या निरर्थक कृत्ये करत आहात,” कोहलीला काही लाज उरली आहे का असे विचारत आणखी एक ट्विटर वापरकर्ता म्हणाला.





सीडीएस जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे लष्करी हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळले




आज तमिळनाडूतील कुन्नूरजवळ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले होते. वृत्तवाहिन्यांद्वारे अपघातस्थळावरील भयानक दृश्ये शेअर केली जात आहेत. वृत्तानुसार, सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीसह १४ हेलिकॉप्टरमध्ये होते. आतापर्यंत ५ णांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. काही अहवालांमध्ये असे म्हटले होते की सीडीएस जखमी आहे परंतु सुरक्षित आहे, परंतु त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी उपलब्ध नाही.


सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे लष्करी हेलिकॉप्टर तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ कोसळल्यानंतर भारतीय हवाई दलाने चौकशी सुरू केली आहे.

 
“सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरचा आज कुन्नूर, तामिळनाडूजवळ अपघात झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे भारतीय हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे.