मुंबईत १६८ कोरोनाबाधितांची नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2021   
Total Views |

 
corona_1  H x W

 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सोमवार , दि. ६ डिसेंबर रोजी मुंबई शहरात १६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७४३३६५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.

 
 
सोमवारी मुंबईत झालेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर शहरातील एकूण मृतांची संख्या १६,३५१ झाली असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १,७१४ इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर ३,०७९ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. शहरातील एकूण १६ इमारतींना महापालिका प्रशासनातर्फे सील करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
 
मुंबईत झालेल्या एकूण चाचण्या - १,२६,४३,६६५

६ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या चाचण्या - २८,४४०

 
 
 

 

@@AUTHORINFO_V1@@