कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरुवारी प.बंगाल राज्य सचिवालय 'नबन्ना' येथे अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी (Gautam Adani) यांची बैठक घेतली. प.बंगालमध्ये गुंतवणूक आणि रोजगार आणण्या संदर्भात दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीची माहिती अदानी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटून मला आनंद झाला. विविध विभागांमध्ये गुंतवणूकीसंदर्भात संभाव्य उद्योग उभारणीवर चर्चा झाली."
"एप्रिल २०२२मध्ये बंगालमध्ये वैश्विक व्यापार संमेलनात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे.’’ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक दीड तास सुरू होती. तृणमुल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बनर्जीही या बैठकीला उपस्थित होते. अदानी यांनी ममतांचा भाचा आणि टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बनर्जी यांच्यासह सचिवालय गाठले होते. मुख्यमंत्र्यांसह त्यांची बैठक अडीच तास सुरू होती. ममता गुरुवारच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्याहून बैठकीला हजर राहिल्या होत्या. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आता ममतांनी राज्यात औद्योगिकरणावर भर दिला आहे.