श्रीनगरमध्ये सापडली १,३०० वर्षे जुनी दुर्गादेवीची मूर्ती; 'ही' आहेत वैशिष्ट्ये

    03-Dec-2021
Total Views |
jammu kashmir _1 &nb



जम्मू -
जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात मंगळवारी (३० नोव्हेंबर २०२१) दुर्गादेवीची सातव्या शतकातील मूर्ती सापडली. ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. खग परिसरातून ही मूर्ती ताब्यात करण्यात आली आहे. दुर्गा मातेची ही मूर्ती १३०० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीनगरच्या पांडाथेरेथन भागात झेलम नदीतून वाळू काढताना कामगारांना ही मूर्ती सापडली.

पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुतळ्याची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीनंतर त्यांनी सांगितले की, ही मूर्ती दुर्गा देवीची आहे आणि सुमारे सातव्या शतकातील आहे. सिंह सिंहासनावर विराजमान असलेल्या या दुर्गेच्या मूर्तीला किंचित नुकसान झाले आहे. मूर्तीमध्ये दुर्गेचा डावा हात नाही. या मूर्तीवर गांधार कलाशाखेचा प्रभाव आहे आणि तिच्या उजव्या हातात कमळ आहे. जप्त केलेली मूर्ती पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे उपसंचालक मुश्ताक अहमद बेग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, “परीक्षणादरम्यान असे आढळून आले की जप्त केलेले शिल्प सुमारे सातव्या ते आठव्या शतकापूर्वीचे (सुमारे १,३०० वर्षे) आहे. ही मूर्ती काळ्या दगडात कोरलेली १२″x८″ आकाराची आहे, ज्यामध्ये देवी दुर्गा सिंह सिंहासनावर विराजमान आहे.” विशेष म्हणजे बडगाम परिसरात दुर्गेची मूर्ती सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबरमध्येही काळ्या पाषाणापासून बनवलेली दुर्गादेवीची मूर्ती सापडली होती.