अयोध्या, काशी नंतर आता मथुरेतही भव्य कृष्ण मंदिर मिळेल : हेमा मालिनी

अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केली इच्छा

    20-Dec-2021
Total Views |

kashi_1  H x W:
नवी दिल्ली : "अयोध्या आणि काशीनंतर मथुरेतही भव्य मंदिर मिळेल, अशी इच्छा भाजप खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या कामाचा हवाला देत त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. रामजन्मभूमी आणि काशीच्या पुनरुज्जीवनानंतर साहजिकच मथुराही खूप महत्त्वाची आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. याआधी केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बल्यान यांनीदेखील, 'कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत काहीतरी मोठे आणि भव्य बांधले जावे.' असे म्हंटले होते.
 
 
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, "श्रीकृष्ण हे प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. त्यांच्या जन्मस्थळाचा खासदार असल्याने मथुरेत भव्य मंदिर व्हावे, असे मी म्हणेन. काशीप्रमाणेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिरासमोर इतका सुंदर कॉरिडॉर विकसित केला आहे. यामुळे आपल्याला मंदिरापासून थेट गंगेपर्यंत जाता येते. मथुरामध्ये एक मंदिर आधीपासूनच आहे आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी विकसित केलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरसारखे नवीन रूप दिले जाऊ शकते. " असे मत त्यांनी व्यक्त केले.