शिवछत्रपती हे देशाचे आराध्य...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2021   
Total Views |

shivaji maharj_1 &nb

ताजमहलाशेजारी उभारल्या जात असलेल्या ‘मुघल म्युझियम’चे नाव उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ असे केले आणि या कृतीमुळे मुघलांच्या अन्यायकारी इतिहासाला खतपाणी घालण्याचे इतके वर्ष झालेले काम मागे पडले. भाषिक प्रांतरचनेच्या आधारावर निर्माण झालेल्या राज्यांनी स्वातंत्र्यानंतर त्या त्या राज्यातील ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक महापुरुषांना भाषेच्या, प्रांताच्या, जातीच्या चौकटीमध्ये बसविलेदेखील असेल. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका राज्याचे नव्हे, तर ती अखंड हिंदूस्थानची अस्मिता आहे.
 
 इथल्या संस्कृतीला बाधा आणणार्‍या मुघली सत्तेला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची केलेली निर्मिती या अखंड हिंदूस्थानचीच प्रेरणा, अस्मिता म्हणावी लागेल आणि त्यामुळेच शिवछत्रपती हे देशाचे आराध्य होतात. सह्याद्रीचा परिसर जरी मराठी भाषिकांचा असला तरी छत्रपती शिवरायांनी ज्या प्रदेशाला स्वराज्यामध्ये आणले त्यामध्ये मराठीसह इतर भाषिक प्रदेशाचासुद्धा सहभाग होताच आणि हे नाकारतासुद्धा येत नाही. नुकतेच वाराणसीमध्ये काशिविश्वेश्वराच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जेव्हा जेव्हा देशाची संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी योद्धे उभे राहिले, असे गौरवोद्वार काढले. परंतु, पुरोगामित्वाच्या खोट्या चेह़र्‍याच्या सरकारांनी कायम शिवछत्रपतींना मराठी भाषिक आणि महाराष्ट्र राज्यापुरतेच मर्यादीत ठेवण्याचे काम केले. मराठी माध्यमांनी पुरोगामी चेहर्‍याच्या आड दडून धार्मिक समतेच्या नावाखाली महाराजांचे विश्लेषणसुद्धा संकुचितरित्या केले आणि त्यामुळे भाषिक राजकारणासाठी राज्यकर्त्यांनी मराठी अस्मिता म्हणून शिवछत्रपतींचे नाव घेतले व तंजावरपर्यंत पसरलेल्या स्वराज्याला स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या सीमांच्या चौकटीमध्ये मोजले गेले. यामुळेच अखंड भारताची प्रेरणा असणारा महाराजांचा इतिहास संकुचित करुन त्याचा फायदा आपली प्रादेशिक राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरु असलेला दिसून येतो आणि राजकारणाचे मुद्दे अस्मितेचे करुन शिवरायांच्या भुमीतील शिवप्रेमीला भडकविले जाते. कारण, शिवछत्रपतींचा होणारा अपमान हा कोण्या भाषिक राज्याचा, प्रांताचा नसतो, तर तो अखंड भारताच्या भावनेचा अवमान असतोच.


भाषिक अस्मितेसाठी अवमुल्यन...



मराठी भाषेचा कळवळा आणून अभिजात भाषेच्या दर्जासाठी न भांडता मराठी ते हिंदुत्व आणि आता थेट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्यापर्यंत शिवसेनेने आजपर्यंतचा प्रवास केला. बंगळुरु येथे शुक्रवारी काही समाजकंटकांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून विटंबना केली आणि महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांनी तेथील सत्ताधारी पक्षावर टिकेची झोड उठवली आणि हा मुद्दा पक्षीय राजकारणाच्या आखाड्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा शिवछत्रपतींना संकुचित चौकटीमध्ये पाहण्याचे पाप येथील महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात आले. कर्नाटकमधील सत्ताधारी पक्षाला वेठीस धरण्यासाठी मराठी भाषिकांचा मुद्दा पुन्हा एकदा वरती काढून तसे करणारे देशाच्या आराध्याचे एकप्रकारे अवमूल्यन करण्याचाच प्रयत्न करित आहेत. औरंगजेबाला सुफी संत म्हणणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेमध्ये बसताना शिवसेनेने एकदा तरी शिवछत्रपतींचा लढा सुफी संताविरुद्धचा होता की; अन्याय-अत्याचार करणार्‍या एका क्रुर मानसिकता असणार्‍या शत्रूशी होता? याचेसुद्धा स्पष्टीकरण नक्कीच द्यावे. कारण, राजकारणापायी तयार केले जाणारे चित्र येणार्‍या अनेक पिढ्यांच्या जडणघडणीवर विघातक परिणाम करणारे असणार आहे. यामुळेच आगामी काळामध्ये देशाचे आराध्य असणार्‍या शिवछत्रपतींचे अवमूल्यन होताना प्रादेशिक पक्षांचे राजकीय धोरण समजून घेणे गरजेचे ठरणार आहे.





कारण, प्रादेशिक अस्मितेच्या टेकुवर उभे असणारे पक्ष हे राजकारणामध्ये यशस्वी होताना प्रादेशिक अस्मितेला वेळोवेळी वेगळे रंग देण्याचा प्रयत्न करतात. नुकत्याच बंगळुरु येथे झालेल्या घटनेचे महाराष्ट्रामध्ये पडलेले पडसाद हे ज्यांनी कृत्य केले त्यांच्याविरुद्ध नसून हे त्या त्या प्रदेशामध्ये असणार्‍या सत्ताधारी पक्षांविरुद्ध सुरु असल्याचे आंदोलनावरुन स्पष्ट होते. शिवरायांच्या प्रतिमेला, पुतळ्याला काळा रंग लावून करण्यात आलेली विटंबना ही निषेधार्ह असून, त्याचा राजकीय पोळी भाजण्यासाठी करण्यात आलेला वापर निंदनीय आहे. कारण, ज्या पक्षासोबत सध्या शिवसेना मांडीला मांडी लावून सत्तेत बसली त्या पक्षाने आपले सरकार असताना ‘एनसीईआरटी’मध्ये शिवछत्रपतींच्या इतिहासाला किती न्याय दिला? औंरगजेबाच्या आवडीनिवडी, शहरातील रस्त्याला दिली जाणारी नावे, शहराला दिली गेलेली नावे यातून काँग्रेस व त्यांच्या समविचारी पक्षांनी कोणत्या अस्मितेला गोंजारले हेसुद्धा कडवट भाषेमध्ये विचारणे गरजेचे आहे.



@@AUTHORINFO_V1@@