भारत- दक्षिण आफ्रिका कसोटी : के.एल. राहुल संघाचा उपकर्णधार

२६ डिसेंबरपासून सुरु होणार सामने ; ३ कसोटी सामन्यांची मालिका

    18-Dec-2021
Total Views |

KL Rahul_1  H x
 
 
मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतर उपकर्णधार पद कोणाकडे द्यायचे हा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर होता. रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे तो या मालिकेतून तूर्तास तरी बाहेर आहे. यानंतर अजिंक्य रहाणे आणि आर. अश्विनचे नाव चर्चेत असताना हे पद के. एल. राहुलकडे देण्यात आले. यासंदर्भात आज बीसीसीआयकडून अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली. २६ डिसेंबरपासून ३ कसोटी सामन्यांची ही मालिका सुरु होणार आहे.
 
 
रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे रोहितचे नाव यामध्ये सहभागी करण्यात आलेले नाही. उपकर्णधार असलेल्या रोहितची जाग कोण घेणार? हा मोठा प्रश्न पडला होता. कारण, गेल्या काही सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेची कामगिरी चांगली झालेली नाही. त्यामुळे हे पद त्याला देणे कितपत योग्य ? असा प्रश्न क्रीडा सामिक्षांकडून विचारला जात होता. तसेच, आर. अश्विनची कामगिरी चांगली होत असली तरीही आधीपासूनच सह्द्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या के. एल. राहुलचे नाव चर्चेत होते.
 
 
असा असेल मुख्य संघ :
 
 
टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), प्रियांक पांचाल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.
 
हे आहेत राखीव खेळाडू
 
नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर आणि अरजान नगवासवाला.