महिला हिंसाचारविरोधी जनजागृती अभियान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2021   
Total Views |

photo.jpg_1  H

प्रीती टपाल आणि सहकारी सुवर्णा


हो... हो... मॅडम मी इथेच आहे. जोपर्यंत त्या पीडित मुलीला तिच्या मुलांसकट ‘शेल्टर होम’ मिळवून देत नाही, तोपर्यंत मी इथून घरी जाणार नाही.” रात्रीचे १२.४५ वाजले होते. विक्रोळीच्या महिला व मुलांकरिता साहाय्यता कक्षाच्या प्रमुख समुपदेशक प्रिती टपाल मला म्हणाल्या. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र पोलीस आणि ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्थानकाच्या आवारात हे कक्ष असतात.





महिलांसंदर्भात होणार्‍या घरगुती हिंसेसंदर्भात समुपदेशन आणि इतर मदतीसाठी हा कक्ष कार्यरत असतो. पीडित महिलेला मानसिक आधार देऊन तिला तिच्या संवैधानिक मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणे व तिला तिच्या निर्णयप्रक्रियेत मदत करणे, महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी अत्याचारी व्यक्तीबरोबर वाटाघाटी करणे, अन्यायग्रस्त महिला व मुलांना निवारा, शैक्षणिक वैद्यकीय व कायदेविषयक मदत मिळवून देणे, केलेल्या कार्याचे संग्रहण करून त्यावरील संशोधनानुसार सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्ती, विद्यार्थी व पोलीस यांच्याकरिता प्रशिक्षण व साहित्य निर्माण करणे, हे काम हा कक्ष करतो. येथील प्रमुख समुपदेशक व्यक्तीची वेळ ठरलेली, जसे सकाळी १० ते सायंकाळी ६. पण एका महिलेला मदत मिळावी म्हणून प्रिती टपाल रात्री १२.४५ पर्यंत कक्षात होत्या. शेवटी पहाटे ३ वाजता पीडित महिलेला ‘शेल्टर होम’मध्ये जागा मिळेपर्यंत त्या माझ्या आणि पिडीतेच्या संपर्कात राहिल्या.




या पीडित महिलेची केस अत्यंत गुंतागुंतीची होती. तिला सात, पाच, तीन आणि एक वर्षाची अशा चार मुली. सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले होते. माहेर असे नव्हतेच. कारण, तीचे अम्मी-अब्बू लहानपणीच वारलेले. अनाथ-असाह्य. सासरच्यांचा राजकीय आणि धार्मिक नेत्यांशी चांगला संपर्क. त्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही, तसेच तीच्या धर्मात पुरूष दुसरा विवाह करू शकतात. त्यामुळे ती कुठेही गेली तरी, तीला न्याय काही मिळणार नाही, हे सगळे सहन करण्यापेक्षा जीव द्यावा असे तीचे मत. हे गार्‍हाणे घेऊन ती माझ्याकडे आलेली. तिची केस घेऊन विक्रोळी पोलीस स्थानकामधील महिला आणि मुलांकरिता असलेल्या या साहाय्यता कक्षात गेले. त्यावेळी प्रिती टपालची पहिली भेट झाली. तथाकथित राजकीय, सामाजिक वगैरे कुणाच्याही दबावाला बळी न पडता या कक्षाने म्हणजे प्रिती टपाल यांच्या साहाय्याने शेवटी या महिलेला त्यावेळी न्याय मिळालाच!





सरकारी-निम सरकारी त्यातही अधिकारीपदावर असलेल्या व्यक्तींच्या कामाच्या वेळा ठरलेल्या, त्यापलीकडे थांबून वगैरे कधी ते एखादे काम करत आहेत, असा अनुभव गेल्या १७ वर्षांतल्या माझ्या समाजजीवनात आला नव्हता. त्यामुळे प्रिती टपाल यांचे नियमानुसारच, पण संवेदनशीलतेने पीडित महिलेसाठी केलेले काम खूप समाधान देऊन गेले. याच साहाय्यता कक्षाने दि. २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या पंधरवडयात ‘महिला हिंसाचारविरोधी जनजागृती अभियान’राबवले. विक्रोळी पूर्व, पश्चिम, कांजूरमार्ग, पवई येथे घरगुती हिंसाचाराचे प्रकार आणि त्याविरोधात कायदे, निर्भया पथक यासंदर्भात जागृतीपर व्याख्यानांचे आयोजन केले गेले. प्रिती म्हणतात,”या सगळ्या कार्यक्रमांमध्ये विक्रोळी पोलीस स्थानक, पार्कसाईट पोलीस स्थानक, निर्भया पथक यांनी मोलाचे सहकार्य केले. ‘आयसीडीएस’च्या मीनलमॅडम, पोतदारमॅडम, विक्रोळी पोलीस ‘पीएसआय’ कदमसर, पार्कसाईट पोलीस पीएसआय सविता मानेमॅडम, कांजूर पोलीस स्थानक ‘पीएसआय’ दीपाली साबळेमॅडम, निर्भया पथक सरोदेमॅडम, महिला पोलीस शिपाई चौधरीमडॅम यांनी खूप सहकार्य केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत.”








@@AUTHORINFO_V1@@