माझा राजकीय धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही : असदुद्दीन ओवेसी

तुम्ही लग्न करा आणी शक्य असेल तितके मुले जन्माला घाला , असदुद्दीन ओवेसी यांचे मुस्लीम समुदायाला आव्हान !

    13-Dec-2021
Total Views |

assudin owisi.jpg_1 

 

मुंबई :  मुंबईत आयोजित एका जाहीर सभेत, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशीदला शहीद म्हणून पुकारले. "१९९२ मध्ये तिच्या विध्वंसासाठी जबाबदार असलेल्या लोकांचे संरक्षण केल्याबद्दल सपा, बसपा आणि काँग्रेसवर टीका केली"."ओवेसी यांनी मुस्लीम समुदयाला आवाहन केले की तुम्ही लग्न करा आणी शक्य असेल तितके मुले जन्माला घाला." ओवेसी म्हणाले, “माझी मशीद (बाबरी) शहीद झाली. त्यावेळेस सपा, बसपा किंवा काँग्रेसमधील कोणी काही बोलले का? माझी मशीद ढासळत असताना त्यांनी डोळेझाक केली.


विशेष म्हणजे बाबरी विध्वंस खटल्याचा निकाल ३० सप्टेंबर २०२० रोजी विशेष न्यायालयाने दिला. ऐतिहासिक निकालात, या प्रकरणातील सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले होते. बाबरी वादग्रस्त वास्तू पाडणे हे पूर्वनियोजित नव्हते, त्यामुळे ती पाडण्याचा कोणताही कट नव्हता, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.

 
बाबरी विध्वंसाचा मुद्दा उचलून धरण्याबरोबरच ओवेसी यांनी मुस्लिम समुदयाला लग्न करून कुटुंब वाढवण्यास सांगून त्यांचे ध्रुवीकरण करण्याचाही प्रयत्न केला. बॅचलरसाठी गूढ टिप्पणी करताना ओवेसी म्हणाले, “शादी करेंगे ना? बॅचलर मत रेहना.पत्नी घर में रहे तो आदमी का दिमाग भी शांत होता है. (तुझं लग्न होईल ना? बॅचलर राहू नकोस. बॅचलरमुळे खूप समस्या निर्माण होतात. जर पत्नी घरात असली की माणूस शांत राहतो.)

धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय दिले? कृपया ते टाळा: असदुद्दीन ओवेसी

 
याशिवाय, एआयएमआयएम प्रमुखांनी धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवरही टीका केली. मला भारतातील मुस्लिमांना विचारायचे आहे की धर्मनिरपेक्षतेतून आपल्याला काय मिळाले? सेक्युलॅरिझममधून आम्हाला आरक्षण मिळाले का? मशीद पाडणाऱ्यांना शिक्षा झाली का? नाही, माझा राजकीय धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही तर घटनात्मक धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. कृपया मुस्लिमांनी राजकीय धर्मनिरपेक्षता टाळावी, असे ओवेसी म्हणाले.


 
हे लक्षात घेण्यासारखे आहे की ओवेसी यांनी त्यांच्या राजकीय सभांमध्ये धर्मनिरपेक्षतेची खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. एआयएमआयएम प्रमुखांनी बर्‍याच काळापासून बहुलवादाच्या संकल्पनेचा अवमान केला आहे. देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करून सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी यूपी निवडणुकीच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. तेव्हा ते म्हणाले होते की, भाजपने देशाची धर्मनिरपेक्षता कमी केली आहे.