लाल सलाम ते पप्पू गुलाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2021   
Total Views |

Congress _1  H


“देश वाचवायचा असेल, तर काँग्रेसमध्ये या. सध्या संसदेत एकाही विषयावर चर्चा होत नाही,” इति ‘भारत तेरे तुकडे होंगे’, ‘इन्शाअल्लाह’ म्हणत भारताचे तुकडे पडावेत, अशी इच्छा असणारा कन्हैया कुमार. दिल्ली ‘जेएनयु’च्या ‘कॅम्पस’मध्ये एका गटाचे नेतृत्व करणारा कन्हैयाकुमार, भारताच्या मातीतले स्वातंत्र्यप्रेम आणि देशनिष्ठा त्याच्या गावीही नाही. कन्हैयाकुमारसारखे लोक खोटे बोलत असतात. त्याचा खोटारडेपणा पाहून मला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक यांनी संदर्भासाठी अभ्यासासाठी दिलेल्या एका पुस्तकाची आठवण झाली. ते पुस्तक होते ‘गौरवशाली दो वर्ष’. हे पुस्तक म्हणजे १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलेला अहवाल आहे. २०१९ ते २०२१ या दोन वर्षांत संसदेमध्ये विचारल्या गेलेले प्रश्न, समस्या, चर्चा आणि त्यातून होणारी निष्पत्ती यासंदर्भात या अहवालात पुराव्यांसकट माहिती उघड केली आहे. त्यानुसार १४व्या लोकसभेचे अध्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचे सोमनाथ चॅटर्जी, तर १५व्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या काँग्रेसच्या मीरा कुमार आणि १६व्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या, भाजपच्या सुमित्रा महाजन. १७व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. तर १४ ते १७व्या लोकसभेच्या काळात सगळ्यात जास्त वेळ मुद्दे, प्रश्न आणि चर्चा झाल्या त्या १७ व्या लोकसभेत. सगळ्यात जास्त लोकसभा सदस्यांनी सहभाग घेतला आणि सगळ्यात जास्त विधेयक पारितही झाले ते याच काळात. ‘३७० कलम’ असू दे की ‘सीएए’ असू दे की ‘तिहेरी तलाक’ विरोधातला कायदा असू देत. ज्याबद्दल सगळ्यात जास्त वाद, चर्चा, भयंकर उलाढाल होऊ शकते, असे मुद्दे याच काळात संसदेत चर्चिले गेले. प्रसारमाध्यमात त्यावर झालेली चर्चा, वाद, प्रश्न सगळ्या देशाने पाहिले. यावेळी केंद्रात भाजपचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. भाजप सरकारच्या या काळात संसदेत लोकशाहीची मूल्ये अत्यंत विश्वासार्हतेने जोपासली गेली. देशात सामाजिक एकता, समता आणि समरसता रूजेल, यासाठी विधेयक पारित झाले. त्यामुळेच संसदेत एकाही विषयावर चर्चा होत नाही, हे ढळढळीत खोटारेडेपणाचे वक्तव्य करण्याआधी कन्हैयाकुमारने जरा अभ्यास करावा, पण दिल्लीच्या ‘जेएनयु’मध्ये फुकटच्या भाकर्‍या खाणार्‍या कन्हैयाकुमारकडून अभ्यासाची तरी काय अपेक्षा म्हणा. ‘लाल सलाम’चा आता पप्पू गुलाम झाला इतकेच...



चु*** किती शाप द्याल!!


काकासाहेबांच्या आदरापोटी मी खुर्ची उचलली तर सगळे चु** (अहं... ही काही शिवी नाही.) मला काहीबाही बोलले. काय म्हणता माझ्या चु** शब्दाचे तुम्हाला काही वाटले नाही. कारण, यापेक्षा आणखी गंभीर शब्दप्रयोग लोक मला करत असतात. काय म्हणता? त्याबाबतीत लोक आमच्या शरद काकासाहेबांना पहिले आठवतात आणि त्यानंतर मला. कसे का होईना? लोक आठवणी काढतात हे महत्त्वाचे. शिव्या तर शिव्या आपल्याला काय? तर गेला महिनाभर मी सारखे प्रसिद्धीच्या झोतात आहे. आता सध्या काकासाहेबांसाठी खुर्ची उचलली म्हणून आणि त्याआधी माझ्या ‘त्या’ अतिसुंदर नृत्यामुळे. साहित्य म्हणू नका, नृत्य म्हणू नका सगळ्यात मी पहिला आहे. काय म्हणता, लोकांच्या शिव्या खाण्यातही पहिला क्रमांक पटकावणार आहे? मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? काकासाहेब? ओ हो असू देत. मी त्यांचा वारसदारच आहे. काकासाहेबांनी अतिशय ऐतिहासिक पहिले मुख्यमंत्रिपद कसे मिळवले? त्याचाच वारसा चालवत आम्ही सध्या महाराष्ट्राची सत्ता मिळवली. काकासाहेब कसे भयंकर पुरोगामी आहेत. मी पण तसाच आहे. देशाचे तुकडे करणार्‍या उमर खलिदला भेटायला मी गेलो ना? मुंबईमध्ये ‘आझाद काश्मीर’चा बॅनर फडकवणार्‍या ‘त्या’ मुलीचे समर्थन मी केले ना? किती पुरावे द्यायचे की, काकासाहेबांसारखा पुरोगामी आहे हे सिद्ध करायला? काकासाहेब महाराष्ट्रातल्या गरिबांच्या आंदोलनावर गप्प बसतात आणि महाराष्ट्राबाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर विनाकारण बोलतात तसेच मीही करतो. शेतकरी आंदोलनावर, उत्तर प्रदेशच्या हाथरस घटनेवर मी बोललो, पण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा झाला, त्याबद्दल मी काहीच बोलत नाही. काकासाहेबांचा वसा घेऊन मी पुढे जात आहे. काय म्हणता, मग मी मुख्यमंत्री कधी होणार? काकासाहेब राष्ट्रपती झाले आणि आमचे साहेब पंतप्रधान झाले की, मी मुख्यमंत्री झालोच. काय म्हणता? यामधली एकही गोष्ट होणार नाही? नाही नाही... मी काकासाहेबांचा भक्त आहे, लाडका आहे. मग होणार ना मी मुख्यमंत्री? पण काकासाहेबांच्या वारसदारांचीही भलीमोठी ‘लिस्ट’ आणि वांद्य्राच्या साहेबांकडेही वारसदार आहेत. कसे होणार? म्हणजे जसे लाखो कार्यकर्ते सतरंजी उचलतच आयुष्य घालवतात तसे मी खुर्ची उचलत आयुष्य खर्च करू म्हणता? चु **नो किती शाप द्याल?




@@AUTHORINFO_V1@@