मुंबई : बॉलीवुड कलाकार उर्वशी रौतेला हिने इस्त्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना दिलेल्या भेटवस्तूची चर्चा जगभरात होत आहे. पंतप्रधान मोदींचे मित्र नेत्यानाहू यांची रौताला हीने भेट घेतली. या भेटीत नेतन्याहू यांना तिने भगवद् गीता प्रदान केली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिने ही माहिती दिली.
आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, "इस्त्रायलचे माजी पंतप्रधान नेत्यानाहू यांचे आभार. माझ्या संपूर्ण कुटूंबाला त्यांना तिथं निमंत्रण दिलं." पुढे तिने भगवत् गीतेचा उल्लेख केला आहे. त्यात ती म्हणते. "कुठल्याही व्यक्तीला योग्यवेळी योग्य भेट देणं आणि परतीची अपेक्षा कधीही न ठेवणं आपण शिकलो तर ती भेटवस्तू कायम पवित्र ठरते."