धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव,

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2021   
Total Views |
 
omicron_1  H x
 
 
 
मुंबई : राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन हळूहळू हात पसरू लागला आहे. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात असली तरी ओमायक्रॉन बाधित रुग्णांचा शिरकाव देशात झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील धारावी परिसरात देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनातर्फे शुक्रवार, दि. १० डिसेंबर रोजी देण्यात आली आहे.
 
 
पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आला होता. त्याचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली गेली आहे. शुक्रवारी धारावीतील एकाला आणि या अगोदर मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे.
 
 
राज्यात १० ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात १० ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. या नव्या विषाणूबाबत अनेकांमध्ये भितीचं वातावरण आहे. दरम्यान यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं आहे की, धारावीनं यापूर्वीही शून्य रुग्ण आकडा अनेकदा गाठला आहे. धारावी लढलीय त्यामुळं घाबरुन जाऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे. या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@