कट्टरपंथ्यांचा निषेध इस्लामचा त्याग : अली अकबर स्वीकारणार हिंदू धर्म

जनरल बिपीन रावत यांच्या निधनाच्या बातमीवर कट्टरपंथ्यांनी व्यक्त केल्या होत्या प्रतिक्रीया

    11-Dec-2021
Total Views |
Ali Akbar _1  H




मुंबई :
मल्याळम दिग्दर्शक अली अकबर आणि त्यांच्या पत्नीने इस्लामचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कारणही तितकेच महत्वाचे मानले जात आहे. कट्टरपंथ्यांच्या निर्लज्जपणाला कंटाळून हिंदू धर्म स्वीकारला आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेबद्दल कट्टरपंथींनी आनंद साजरा केला. 


रावत यांच्या अपघातानंतर कट्टरपंथींनी निर्लज्जपणे आनंद व्यक्त केला होता. याच गोष्टीचा निषेध म्हणून अली अकबर यांनी इस्लाम सोडत असल्याचे म्हटले आहे. रामसिम्हानि, असे नाव स्वीकारत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अपघातात जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि १२ अन्य अधिकाऱ्यांचे निधन झाले. त्यावेळी कट्टरपंथींनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करण्यात आला होता.



याबद्दल बोलताना अकबर म्हणाले की, "इस्लामच्या सर्वोच्च नेत्यांनीही अशा देशद्रोहींचा विरोध केला नाही. ज्यांनी शूर लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान केला. मी हे स्वीकारू शकत नाही. आता माझा इस्लाम धर्मावरील विश्वास उडाला आहे." यासंदर्भातील एक व्हिडीओही त्यांनी बुधवारी फेसबुकवर शेअर केला आहे.


'आजपासून मी मुस्लीम नाही, तर भारतीय आहे. माझे हे उत्तर त्या लोकांसाठी आहे ज्यांनी भारताविरोधात हजारो हसतमुख इमोटिकॉन पोस्ट केले आहेत.'' अकबर यांच्या पोस्टनंतर अनेक कट्टरपंथींनी त्यांच्या पोस्टला विरोधही केला. मात्र, अनेक युजर्सनेही त्यांना पाठिंबा दिला. त्यांना धमक्या आल्यानंतर त्यांनी ही पोस्ट आता फेसबूकवरून हटविली आहे. अकबर म्हणाले, "ते आणि त्यांची पत्नी हिंदू धर्म स्वीकारतील आणि अधिकृत रेकॉर्डमध्ये धार्मिक माहिती बदण्याची प्रक्रिया सुरू करतील. आपल्या दोन्ही मुलींना धर्मांतर करण्यास भाग पाडणार नाही.