चार दशकांपासून प्रलंबित शरयू प्रकल्पासाठी सीएम योगींचे योगदान

पंतप्रधान करणार उद्घाटन

    10-Dec-2021
Total Views |
sharau _1  H x



लखनऊ -
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबर २०२१ रोजी 'शरयू कालवा प्रकल्प' चे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरने बहराइच येथे पाहणी केली. येथे त्यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे ९ जिल्ह्यातील ३० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
 
 
शरयू कालवा राष्ट्रीय प्रकल्प चार दशकांहून अधिक काळ प्रलंबित असल्याची माहिती योगींनी दिली. आता पंतप्रधान मोदी ११ डिसेंबरला हा बहुप्रतिक्षित प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. याचा फायदा ९ जिल्ह्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना होणार असून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. सीएम योगी यांनी ट्विट केले की, “१० हजार कोटी रुपये खर्चाचा शरयू कालवा राष्ट्रीय प्रकल्प ६,२२७ गावांमधील सुमारे १५ लाख हेक्टर जमीन सिंचन करेल. कृषी आणि शेतकरी उन्नतीसाठी समर्पित 'शरयू कालवा राष्ट्रीय प्रकल्प' विकासाचे नवे मापदंड प्रस्थापित करेल.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी बहराइच, श्रावस्ती आणि बलरामपूर ते गोरखपूर ते बलरामपूर या ३१८ किमी लांबीच्या शरयू कालव्याचे उद्घाटन करणार आहेत. पूर्वांचलमधील पूर आणि दुष्काळाच्या समस्येला तोंड देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. त्याचे बांधकाम १९७२ पासून सुरू झाले. पण त्यावरचे बहुतांश काम २०१७ नंतर झाले. ११ डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन होईल, त्यानंतर ११ डिसेंबरला श्रावस्तीच्या राप्ती बॅरेजचे आठ शटर उघडले जातील. हे पाणी थेट नद्यांना जोडून पुढे जाईल.