मुंबई : मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणाऱ्या मोहित कम्बोज-भारतीय यांनी त्यांच्या वकिलासह एक फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी दिलेल्या कॅप्शनमुळे कम्बोज विरोधकांचा तीळपापड झाला आहे. ते म्हणाले, "माझ्यावर आणि माझ्या वकीलांवर सातत्याने प्रश्न विचारले जातात. फैझ मर्चंट हे मुस्लीम आहेत, त्यावर मी उत्तर देतो होय... भारतीय मुस्लीम...भारत माता की जय !", असे म्हणत त्यांनी फैझ यांच्यासह फोटो ट्विट केला आहे.