जगभरात धर्मांधविरोधी वातावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2021   
Total Views |

hamad_1  H x W:
 
 
 
'शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी दि. ६ डिसेंबर रोजी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात परतले. तत्पूर्वी त्यांनी मोहम्मद पैगंबरासह कुराणाबद्दलचे आपले विचार मांडले होते आणि त्यामुळे इस्लामी कट्टरपंथीय खवळल्याचे दिसून आले. मात्र, वसीम रिझवी अथवा त्यांच्यासारख्या कोण्या व्यक्तीने मोहम्मद पैगंबराचे चरित्र आणि कुराणाबद्दल विरोधी मत व्यक्त केल्याची उदाहरणे भारतातच नव्हे तर जगभरातही दिसतात. ‘पॅलेस्टाईन’मध्ये जन्मलेले हसन मोसाब युसूफ एकेकाळी कुख्यात दहशतवादी संघटना ‘हमास’साठी काम करत असत. परंतु, आता त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून इस्लामविरोधी झाले आहेत. इस्रायलसाठी काम करत आहेत, ‘टाईम्स ऑफ इस्रायल’नुसार हसन मोसाब युसूफ म्हणतात की, “इस्लाम शांतता नव्हे तर युद्धाचा धर्म आहे. पण, मुस्लिमांनाच आपल्या धर्माबद्दल पुरेशी माहिती नाही.” उल्लेखनीय म्हणजे, हसन मोसाब युसूफ कोणी ऐरेगैरे नाहीत, तर ‘हमास’च्या संस्थापकाचे पुत्र आहेत आणि आपल्या पित्यामुळेच ते ‘हमास’साठी काम करत होते. मात्र, काळ पुढे गेला तसतसे ते ‘हमास’पासून दुरावले आणि त्यांनी इस्रायलसाठी ‘हमास’विरोधात काम सुरू केले. त्यावरून त्यांना गद्दारही म्हटले जाते. त्यांनीदेखील वसीम रिझवींप्रमाणेच मोहम्मद पैगंबरावर टीका केलेली आहे. हसन मोसाद युसूफ यांनी एक पुस्तकही लिहिले असून त्यात त्यांनी ‘हमास’ची कृत्ये, धार्मिक राजकारण सांगितले आहे. पण ते तेवढ्यावर थांबणार नसून मोहम्मद पैगंबराच्या जीवनावर चित्रपटही तयार करणार आहेत.
 
 
दरम्यान, मध्य पूर्व आणि इराणमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार दोन्ही देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल करत असून धार्मिक, राजकीय संस्थांमध्ये सुधारणांची मागणी गतिमान झाली आहे. अमेरिकेच्या ‘प्रिन्स्टन विद्यापीठ’ आणि ‘मिशिगन विद्यापीठा’अंतर्गत काम करणाऱ्या अरब बॅरोमीटरनामक मध्य-पूर्वेतील सर्वात मोठ्या सर्वेक्षणकर्त्या संस्थेने सदर सर्वेक्षण केले आहे. त्यांनी आपल्या सर्वेक्षणासाठी लेबनॉनमध्ये २५ हजार जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यातील निष्कर्षांनुसार, एका दशकाहून अधिक कालावधीत धर्माविषयीच्या वैयक्तिक श्रद्धेत जवळपास ४३ टक्क्यांची घट झाली आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या संकेतानुसार आता एक तृतीयांशपेक्षाही कमी लोकसंख्या स्वतःला धार्मिक व्यक्ती समजते. ‘ग्रुप फॉर अ‍ॅनालायझिंग अ‍ॅण्ड मेजरिंग अ‍ॅटीट्युड्स इन इराण’ने (गामान) घेतलेल्या ५० हजार जणांच्या मुलाखतीतून येथील ४७ टक्के लोकसंख्या धार्मिकपासून अधार्मिक झाली आहे. नेदरलँडच्या ‘उटरेष्ट विद्यापीठा’त धार्मिक संशोधन विभागाचे साहाय्यक प्राध्यापक पूयान तमिनी सदर सर्वेक्षणाचे सहलेखक आहेत. ‘डीडब्ल्यू’ वृत्तसंस्थेला त्यांनी सांगितले की, “इराणी समाजाने एका व्यापक परिवर्तनातून प्रवास केला आहे. तिथे साक्षरतेचा दर प्रचंड वाढला आहे, देश व्यापक शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे, आर्थिक सुधारणांनी पारंपरिक कौटुंबिक ढाँचावर प्रभाव पाडला आहे, इंटरनेटचा प्रसार युरोपीय संघाइतका वेगाने वाढत आहे आणि प्रजनन दर घटला आहे.” इराणमधील सर्वेक्षणात भाग घेणाऱ्यांपैकी ९९.५ टक्के लोक शिया होते. त्यातल्या ८० टक्क्यांनी ईश्वरावर विश्वास असल्याचे म्हटले. पण, स्वतःला शिया मुस्लीम सांगणाऱ्यांची संख्या केवळ ३२.३ टक्के होती. नऊ टक्क्यांनी स्वतःला नास्तिक सांगितले. या निष्कर्षांचे विश्लेषण करताना तमिनी म्हणतात की, आस्था आणि विश्वासाबाबत आम्हाला वाढती धर्मनिरपेक्षता आणि विविधता दिसत आहे. शासन आणि धर्माचे मिश्रण सर्वाधिक निर्णायक तत्त्व असून त्याच कारणाने ईश्वरावर विश्वास ठेवूनही धार्मिक संस्थांकडून बहुतांश लोकसंख्येचा अपेक्षाभंग झाला आहे.
 
 
दरम्यान, नुकतेच ‘इसिस’ने आपल्या ’व्हॉईस ऑफ हिंद’ नियतकालिकात भगवान शंकराच्या प्रतिमेला विकृत पद्धतीने दाखवत ‘फॉल्स गॉड’ नष्ट होण्याची वेळ आल्याचे म्हटले होते. वस्तुतः, संपूर्ण जगाला एकाच रंगात रंगवण्याचे मनसुबे बाळगणाऱ्यांचा राग आणि जळफळाटच यातून दिसून येतो. मात्र, युवा पिढी इस्लाम सोडत आहे. कारण, त्यांच्यावर दहशतवादाचा शिक्का लागतो आणि त्यांच्या नावामुळे त्यांना अतिरिक्त तपासणीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच धर्मांध इस्लामींचे कौर्य आणि कट्टरतेविरोधात सर्व बाजूंनी आवाज उठवला जात आहे. अली सिना यांचे ‘अंडरस्टॅण्डिंग मोहम्मद’ पुस्तक प्रसिद्ध आहे, तर पूर्वाश्रमीच्या मुस्लीम अमीना सरदार, इस्लाम सोडणाऱ्यांची त्सुनामी येणार आहे, असे म्हणताना दिसतात. अमीना यांच्यानुसार, लोक लपून-छपून इस्लाम सोडत आहे. त्यामुळेच ‘इसिस’ घाबरली असून अन्य धर्मीयांच्या देवतांबाबत विकृत माहिती प्रसारित करत आहे का, प्रश्न निर्माण होतो.
 
 
@@AUTHORINFO_V1@@