अखिलेश यादवांचे व्यंगचित्र व्हायलर; फेसबुकच्या झुकरबर्गवर गुन्हा दाखल

    01-Dec-2021
Total Views |
akhilesh yadav _1 &n



लखनऊ -
'बुवा बाबुआ' या फेसबुक पेजवरील कारवाईबाबत सपाच्या एका नेत्याने गुन्हा दाखल केला आहे. या पेजवर व्यंगचित्र आणि व्हिडिओ पोस्ट करून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली जात असल्याचा आरोप आहे. कन्नौजमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्गसह 49 लोकांची नावे यात आहेत. यामध्ये पेज ऑपरेटरपासून ते कार्टून लाईक, कमेंट, शेअर करणाऱ्यांपर्यंत सपा नेत्याचा आक्षेप आहे.


रिपोर्टनुसार, कन्नौजच्या सरहटी गावचे रहिवासी सपा नेते आणि वकील अमित यादव यांनी या फेसबुक पेज विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सोमवारी (२९ नोव्हेंबर २०२१) कन्नौज जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी धरमवीर सिंग यांनी पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी ठाठिया पोलिस ठाण्यात कलम १५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर बुवा बाबुआ नावाने फेसबुक पेज सुरू असल्याचा आरोप तक्रारदार अमित कुमार यांनी केला आहे. यावर सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याबद्दल अशोभनीय टिप्पणी आणि व्यंगचित्रे टाकली जात आहेत. रिपोर्टनुसार, नुकतेच या पेजवर अखिलेश यादव यांचे एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले होते. ठाठिया पोलिस स्टेशनचे प्रभारी नारायण बाजपेई सांगतात की, कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.


बुवा बाबुआवर विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात साहित्य पोस्ट केले जात असल्याचा आरोप आहे. तक्रारदार अमित कुमार यांनी आरोप केला आहे की, यावर्षी २५ मे रोजी नोंदणीकृत पोस्टाद्वारे त्यांनी पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात एक अर्ज पाठवला होता. मात्र कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. हे पेज बंद करण्याबाबत फेसबुकच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयालाही अहवाल पाठवण्यात आला आहे.