भाजप नेते मोहित भारतीयांच्या दाव्याची न्यायालयाकडून दखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2021   
Total Views |
 
mohit_1  H x W:
 
 
 
मुंबई : भाजप नेते मोहित भारतीय यांनी दाखल केलेल्या फौजदारी अब्रूनुकसानीच्या दाव्याची न्यायालयाने दखल घेतली आहे. सोमवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नोटीस बजावली आहे. 
 
 
मोहित भारतीय यांनी 9 ऑक्टोबर रोजी मलिक यांना कायदेशीर नोटीस बजावली होती आणि मलिक यांना पुढील विधाने करणे थांबवण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतरही मलिक सातत्याने पत्रकार परिषदा घेत भारतीय यांच्यावर आरोप करत होते. या आरोप-प्रत्यारोपानंतर 11 ऑक्टोबर रोजी भारतीय यांनी मलिकांना दुसरी कायदेशीर नोटीस पाठवून त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. 
 
 
मोहित भारतीय यांनी मुंबई येथील माझगाव मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटसमोर दाखल केलेल्या तक्रारीत असा दावा केला आहे की, पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी मुद्दाम माझी आणि ऋषभ सचदेवा यांची बदनामी केली. मलिक यांनी ‘एनसीबी’ला लक्ष्य करण्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. नवाब मलिक यांनी जे शब्द उच्चारले होते. त्यामुळे तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचे न्यायालयात प्राथमिकदृष्ट्या सिद्ध झाल्याचे मोहित भारतीय यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी मलिक यांना न्यायालयाकडून नोटीसही बजावण्यात आल्याचा दावा मोहित भारतीय यांच्याकडून करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@