राज्यातील महत्वाच्या प्रशांकडे सामान्य जनतेचे दुर्लक्ष होण्यासाठीच समीर वानखेडे यांच्यावर टीका

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

    07-Nov-2021
Total Views |

चंद्रकांत पाटील _1 &
 
 
 
पुणे : राज्यातील अनेक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाहीये, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाहीये , राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार अश्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे आणि त्यांचे महत्वाचा नसलेल्या मुद्यांकडे लक्ष जावे म्हणून हेतुपरस्पर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून समीर वानखेडे यांना दरोरोज लक्ष केले जात आहे अश्या प्रकारची टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केली.

एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर टीका करताना त्याच्या कुटुंबियांना पण विनाकारण धारेवर धरण योग्य नसून हा प्रकार त्वरित थांबवण्याची विनंती त्यांनी या वेळेज केली. नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या बद्दल खरंच काही माहिती असेल तर समीर वानखेडे यांच्या चौकशीची मागणी करावी ; त्यांच्या विरोधात रोज पत्रकार परिषद घेऊन टीका करणे योग्य नाही असेही ते या वेळेज म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीविषयी शोक व्यक्त केला.

देशभरात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या ६ वरून ७ जागा झाल्या आहेत तर काँग्रेस पक्षाच्या जागा २ ने कमी होऊन त्या ८ वर आल्या आहेत; त्यामुळे देशभरातील पोटनिवडणुकीच्या निकालामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केल्याचा दावा त्यांनी खोडून काढला.