छटपूजेवरील निर्बंधांवरून विरोधकांचा पालिकेवर निशाणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2021   
Total Views |
 


chat pooja_1  H
 
 
 
मुंबई : उत्तर भारतीय समाजासाठी अत्यंत पूजनीय मानल्या जाणाऱ्या छट पूजेसाठी अखेर मुंबई महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, परवानगी देताना महापालिकेने लावलेल्या निर्बंधांमुळे मात्र विरोधकांसह अनेक मुंबईकर नागरिकांनी यावर आपली नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे.
 
 
 
महापालिकेतर्फे यावर्षी छठपूजेच्या उत्सवाला परवानगी देताना भाविकांना शहरातील समुद्रकिनारे टाळून कृत्रिम तलावांमध्ये पूजा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे उत्तर भारतीय मतदार नाराजी व्यक्त करू लागले आहेत. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजपने शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाला भक्तांवर होत असलेला अन्याय” असे म्हटले आहे. तर ज्याप्रमाणे गणेशोत्सवाला नियम आणि अटींसह परवानगी देण्यात आली होती, त्याप्रमाणेच छठपूजेला देखील काही निर्बंधांसह परवानगी देण्याची मागणी केली जात आहे.
 
 
 
दरम्यान, महापालिका प्रशासनातर्फे घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना “अयोग्य” ठरवत विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसने महापालिइकच्या निर्णयाविरोधात काही आक्षेप नोंदवले आहेत. भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा म्हणाले की, “छट पूजेच्या दरम्यान समुद्रकिनाऱ्यांवर जाऊन पूजा करण्यास महापालिकेने परवानगी दिली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. पूजेदरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी काही ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले पाहिजेत. महापालिकेने या जबाबदाऱ्या आयोजकांवर टाकू नये. गणपती विसर्जनाला मर्यादित पद्धतीने परवानगी देण्यात आली होती, मात्र आता निर्बंध लादले जात असतील तर हे केवळ अन्यायकारक आहे,' असे भाजप नेते आणि नगरसेवक विनोद मिश्रा यांनी म्हटले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@