लोकल तिकिटांच्या विक्रीत घसघशीत वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2021   
Total Views |
 
Untitled_1  H x
 
 
 
मुंबई : राज्यातील कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये दिलेल्या शिथिलतेमुळे सार्वजनिक वाहतूक सेवेच्या वापरामध्ये वाढ बघायला मिळत आहे. निर्बंधांच्या शिथिलीकरणाचा मुंबईची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेवरही परिणाम दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना काही अटींसह लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्यानंतर लोकल तिकिटांच्या विक्रीत घसघशीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
 
पश्चिम आणि मध्य रेल्वेवर एकेरी आणि परतीच्या प्रवासाच्या दैनंदिन तिकिटांची विक्री मंगळवारी जवळपास 3 लाखांच्या आसपास पोहोचली. तर सोमवार, दि. १ नोव्हेंबर रोजी सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली होती. तुलनात्मकदृष्ट्या मागील अनेक दिवसांपासून लोक तिकिटांच्या विक्रीत दिवसेंददिवस वाढ होत असल्यासाचे दिसून येत आहे.
 
मोबाईल ऍपची प्रवाशांची मागणी
'रेल्वेने उपनगरीय तिकीट आणि मासिक, त्रैमासिक आणि सहा-मासिक पास बुक करण्यासाठी मोबाइल तिकीट प्रणाली पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे. तिकीट बुक कार्रणार्र्या प्रवाशांचे लसीकरण झाले आहे का ? किंवा संबंधितांनी लसींचे किती डोस घेतले आहेत ? याबाबतची माहिती मोबाईल ऍपद्वारे गोळा करणे अधिक सोयीचे ठरेल," असे प्रवासी हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@