मुंबईत २६२ कोरोनाबाधितांची नोंद;

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2021   
Total Views |
 
corona_1  H x W
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गुरुवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी मुंबई शहरात २६२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७,३४,८५९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
गुरुवारी मुंबईत सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३,३७० इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर १,७८० दिवसांवर गेला आहे. शहरातील एकूण २३ इमारती पालिका प्रशासनातर्फे सीलबंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@