बांगलादेश हिंसाचारामागील कट्टरतावादी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2021   
Total Views |

Bangladesh _1  

बांगलादेशमधील हिंदूंवर सतत कट्टरपंथीय संघटनांमार्फत होणारे हल्ले ही काही साधी घटना नाही. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा नरसंहार सुरू आहे. हे हल्ले रोखण्यासाठी फोल ठरत असलेल्या बांगलादेश सरकारच्या नाकाखालीच या कट-कारवाया सुरू आहेत.
 
नऊ वर्षांत हिंदू समाजावर एकूण ३ हजार, ७२१ हल्ले झाले. हे हल्ले घडवून आणण्यामागे प्रामुख्याने तीन इस्लामिक कट्टरपंथीय संघटनांचा हात आहे. अनुक्रमे ‘अन्सरुल्लाह बांगला टीम’, ‘हिफाजत-ए-इस्लाम’ आणि ‘जमात-उल-मुजाहिद्दीन - बांगलादेश.’ ‘ढाका ट्रिब्यून’ने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ हे बांगलादेशातील हिंदूंसाठी सर्वात भयंकर वर्ष ठरले. कारण, काही दिवसांत हिंदू मंदिरे आणि दुर्गापूजेतील मंडपांवर हल्ले झाले.
 
हिंदू मंदिरांना लक्ष्य करणे, सांप्रदायिक दंगली भडकविणे हे या संघटनांचे प्रमुख कार्य आणि उद्देश. एकदा हिंदू समाज भयभीत झाला की, धर्मांतरणासाठी बळजबरी करणे हे मग पुढील उद्दिष्ट. म्हणूनच गेल्या नऊ वर्षांत हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांची एकूण १,६७८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे सर्व आकडे ‘ढाका ट्रिब्यून’चे आहेत. तीन वर्षांची आकडेवारी काढली, तर एकूण २० हिंदू कुटुंबांवर हल्ले झाले आहेत. आता या कट्टरतावादी संघटना नेमक्या कोण आहेत, हे पाहू.
 
‘अन्सरुल्लाह बांगला टीम’ (एबीटी)या संघटनेचा म्होरक्या म्हणजे मुहम्मद जसिमुद्दीन रहमानी. ढाकाच्या एका मशिदीत रहमानी इमाम होता. २००८ ते २०३१ पर्यंत पाच वर्षांत त्याने ही संघटना उभारली. ‘अन्सरुल्लाह बांगला टीम’ नावाचे त्यांचे संकेतस्थळही आहे. सोशल मीडियाद्वारे स्वतःच्या विचारांचा प्रचारप्रसार करण्याचे कामही संकेतस्थळ करते. अर्थात, फेसबुकवर तर त्यांचे स्वतंत्र पेजही आहे आणि पाकिस्तानात याचा ‘सर्व्हर’ आहे.
 
धर्मांतरणाच्या नावाखाली हिंदूद्वेष भडकविणे, हिंदूविरोधी गरळ ओकण्याचे काम सातत्याने या संघटनेतर्फे केले जाते. २०१३ मध्ये बांगलादेशात ‘सेक्युलर ब्लॉगर्स’च्या हत्याकांडांचे प्रकरण उघड झाले होते. त्यापाठी मागे याचाच हात होता. आता इतका लवाजमा चालवायचा म्हणजे त्याला आर्थिक पाठबळ हवेच! त्यासाठीचा बंदोबस्त करत असताना २०१५ मध्ये एका बँकेवर या महाशयांनी दरोडा टाकला. सरकारच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांच्या संघटनेवर बंदी लादण्यात आली. तोपर्यंत ही कृत्य उघडपणे करण्यास त्यांना परवानगी होती.
 
दुसरी संघटना म्हणजे महिबुल्लाह बाबूनागरी याची ‘हिफाजत-ए-इस्लाम.’ २०१० मध्ये मदरशांतील मौलवींना आणि मुलांना एकत्र घेऊन हा कट्टरतावादी गट त्याने स्थापन केला. अर्थात याला पाठबळ आहे पाकिस्तानातून. तिथूनच या सर्वांना आर्थिक रसद पुरविली जाते. स्वतः भीकेला लागलेला हा देश मात्र इतर देशातील संघटनांना पैसा पुरविण्यात तेवढा आघाडीवर. २००९ मध्ये बांगलादेशातील सरकारने महिला विकास नीती मसुदा तयार केला होता. तेव्हादेखील या कट्टरपंथीयांनी विरोध केला, तोडफोड केली.
 
आंदोलनांच्या नावाखाली हिंसाचार पसरवला. यामुळे या संघटनेला प्रसिद्धी मिळाली. याच वर्षात मोदींच्या बांगलादेश दौर्‍यानिमित्त याच संघटनेने ८० हिंदूंच्या घरांवर हल्ले केले. दंगली भडकविल्या. बांगलादेशच्या सहसचिव ममुनुल हक यांच्या विरोधात एक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याच्या निषेधार्थ ही कारवाई करण्यात आली होती. तिसरी संघटना म्हणजे ‘जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश’ (जेएमबी). मौलाना सैदुर रहमान हा या संघटनेचा म्होरक्या आहे. १९९८ पासून ही संघटना कार्यरत आहे.
 
२००५ मध्ये बांगलादेशच्या ६४ जिल्ह्यांमध्ये ५०० साखळी बॉम्बस्फोट झाले. त्याच वेळी या संघटनेच्या सर्व सदस्यांच्या मुसक्या बांगलादेश सरकारने आवळल्या होत्या. २०१० पर्यंत या संघटनांच्या कारवाया थांबल्याने ही संघटना संपल्यात जमा आहे, असा सर्वांचा समज झाला. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा एकदा बर्दवान भागात स्फोट झाला होता. हा स्फोट चुकीमुळे झाल्याने त्यांच्या लपण्याच्या जागा सरकारसमोर आल्या होत्या. २०१६ मध्ये पुन्हा एकदा ‘आर्टिजन बेकरी’त स्फोट घडविल्याने ही संघटना चर्चेत आली.
 
जेव्हा जेव्हा या संघटना संपल्यात जमा झाल्या असे म्हणण्याची वेळ आली, त्या त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्या दृष्कृत्याने त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. कधी दहशतवादी हल्ल्यांपेक्षा दंगली उसळवून माथी भडकविण्याचे काम त्यांनी पद्धतशीरपणे सुरू केले. बांगलादेशात दरवर्षी सरासरी ४०० हिंदूंवर हल्ले होतात. हा आकडा कमी होण्यासाठी या संघटनांचे मूळ ठेचणे गरजेचे आहे.






@@AUTHORINFO_V1@@