इस्लाम शिकवण्याच्या बहाण्याने मदरशांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण

    03-Nov-2021
Total Views |
muslim _1  H x




कोझिकोड -
केरळमधील कोझिकोड मुखदार तरबीथुल इस्लामिक सेंटरमध्ये इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या तरुणीने मदरशाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. या महिलेने केंद्राच्या प्रमुखावर महिला आणि मुलींना इस्लाम शिकवण्याच्या बहाण्याने छळ आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.




जनम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत महिलेने सांगितले की, इस्लामिक मदरशाच्या प्रमुखाने मोठ्या प्रमाणात मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. या महिलेने या मदरशाची तुलना तुरुंगाशी केली आणि महिला व मुलींना धार्मिक मदरसे सोडण्यास बंदी असल्याचे सांगितले. महिलेच्या म्हणण्यानुसार, मदरशाच्या प्रमुख असलेल्या मुस्लिम धर्मगुरूने एके दिवशी १८ ते १९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. यानंतर मुलीला सांगण्यात आले की, अंघोळ केल्यावर तिचे सर्व पाप माफ होतील. या घटनेबद्दल तिला कसे कळले याबद्दल तपशील देताना, महिलेने जनम टीव्हीला सांगितले की पीडित महिलेने तिला या घटनेविषयी सांगितले.





ही महिला पुढे म्हणाली की, पीडितेला तिच्या कुटुंबीय त्याच दिवशी घेऊन गेले. मुस्लिम धर्मगुरूंनी मजहबी केंद्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी असुरक्षित महिला आणि मुलींना कसे लक्ष्य केले आणि नंतर त्यांच्यावर असह्य अत्याचार केले हे त्या महिलेने सांगितले. महिला आणि मुलींना राहण्यासाठी घर आणि खर्चासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने त्यांना मदरशांमध्ये जाण्यासाठी फूस लावली जात होती. मुलींना ४० दिवस केंद्रात राहण्यास सांगितले होते. यादरम्यान मदरशाच्या प्रमुखाने प्रत्येकासोबत वैयक्तिकरित्या वेळ घालवला. खोलीत जाऊन त्याने मुलींचा छळ आणि लैंगिक शोषण केल्याचे महिलेने उघड केले. १९ वर्षीय मुलीने केलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत बोलताना महिलेने सांगितले की, ही घटना ८ जून रोजी घडली होती. परंतु, या मुलीला धमकावल्यामुळे तिने या घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली नाही.