‘कोरोना’च्या नव्या ‘व्हेरिएंट’लाघाबरण्याची गरज नाही

‘ओमिक्रॉन’बाबत ‘आयसीएमआर’चे स्पष्टीकरण

    29-Nov-2021
Total Views |

omricorn.jpg_1  

 नवी दिल्ली :
“कोरोनाचा नवीन ‘व्हेरिएंट’ आला असला, तरी घाबरण्याचे काहीही कारण नाही. नागरिकांनी कोरोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शकसूचनांचे तंतोतंत पालन करावे, ” असे आवाहन ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) वतीने करण्यात आले आहे.

“कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन ‘व्हेरिएंट’मुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयसीएमआर’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ समीरन पांडा यांनी याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या नवीन ‘व्हेरिएंट’च्या जीन्स आणि संरचनेत बदल दिसून आले आहेत. या बदलांमुळे त्याची संसर्गजन्य क्षमता वाढेल की लसीचा प्रभाव कमी होईल? याची चाचपणी केली जात आहे.

कोरोनाचा नवीन ‘व्हेरिएंट’ आला असला, तरी घाबरण्याचे काहीही कारण नाही. यापेक्षा नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा आणि तो घेण्यात विलंब करू नये. तसेच कोरोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे,” असे पांडा यांनी शनिवारी सांगितले.




“...तर भारतासाठी मोठा धोका ‘ओमिक्रॉन’बाबत खबरदारी न बाळगल्यास भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो, असा इशारा ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिला. ‘ओमिक्रॉन’बाबत सर्व आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘मास्क’ वापरत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. आपल्या खिशातील ‘मास्क’ हा एक प्रकारची लसच असल्याचेही त्या सांगायला विसरल्या नाहीत.”