दक्षिण आफ्रिकेतून आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

दक्षिण आफ्रिकेतून आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

    29-Nov-2021
Total Views |



corona positive_1 &n
 
 
 
 
डोंबिवली : दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून आलेल्या एका 32 वर्षीय प्रवाशाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी सोमवारी पाठविण्यात येणार असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याला ओमिक्रोनची लागण झाली आहे की नाही ते स्पष्ट होणार आहे.

दक्षिण आफ्रि केतून हा प्रवासी 24 नोव्हेंबरला डोंबिवलीत आला होता. हा रुग्ण आल्यापासून कोणाच्याही संपर्कात आलेला नाही. या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यावर त्याला तात्काळ त्यांच्या नातेवाईकापासून लांब राहण्यास सांगितले. या रुग्णाला कल्याण येथील आर्ट गॅलरीमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांच्या भावांची कोरोना चाचणी नेगिटीव्ह आली आहे. कुटुंबातील इतरांची चाचणी सोमवारी करण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
 
-----------------------------------------------------------