बाललैंगिक अत्याचारातील वाढ चिंताजनक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2021   
Total Views |
child abuse_1  
 
 
 
कोरोनाच्या काळात घराघरात बंदिस्त झालेल्या जीवनाच्या काळात आणि जीवनाच्या अनिश्चिततेच्या काळातही बाललैंगिक अत्याचाराची जागतिक स्तरावर वाढलेली आकडेवारी भयावह आहे. देशातील निरपराध लोकांच्या शोषणात केवळ वाढच दिसून आली. २०२० मध्ये, ‘युएस’मधील अधिकाऱ्यांना ‘बालशोषण सामग्री’चे ‘रेकॉर्डब्रेक २०.१७’ दशलक्ष अहवाल प्राप्त झाले. आभासी जगात विखुरलेले ‘पोर्नोग्राफिक’ साहित्य बालपण धोक्यात आणत आहे. बाललैंगिक अत्याचारामुळे विकृत प्रवृत्तीला जन्म मिळत आहे. जगभरात बाल लैंगिक शोषण सामग्रीची सहज उपलब्ध होणारी ‘ऑनलाईन’ उपलब्धता बाल शोषणाच्या कल्पनेला चालना देणारा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्स’मधील ‘क्रिमिनोलॉजी’चे प्रोफेसर मायकेल साल्टर आणि डेलेनी वुडलॉक यांच्या मते, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तसेच इंटरनेट कंपन्या आणि विस्तारात गुंतलेल्या सरकारांच्या खराब कृतीमुळे इंटरनेट आणि ‘स्मार्ट गॅझेट्स’च्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’मार्फत नुकतीच एक आकडेवारी सादर करण्यात आली. त्यानुसार २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये देशभरातील मुलांवरील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ४०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. २०२०च्या या आकडेवारीत, उत्तर प्रदेशमध्ये मुलांविरुद्धच्या ‘ऑनलाईन’ गुन्ह्यांची सर्वाधिक १७० प्रकरणे नोंदवली गेली.
 
 
कर्नाटकात १४४, तर महाराष्ट्रात १३७ गुन्हे दाखल झाले आहेत. साक्षरतेत अव्वल असलेल्या केरळचाही या यादीत समावेश आहे. या त्रासदायक प्रवृत्ती जगभरात वाढत आहे. जर्मनीच्या केंद्रीय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बाललैंगिक शोषणाची छायाचित्रे पाहण्याची इच्छा असलेल्या लोकांची संख्या एका वर्षात दुप्पट झाली आहे. २०२०मध्ये, लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यांच्या छायाचित्रांच्या वितरणाबाबत पोलिसांना विविध स्रोतांकडून ५५ हजारांहून अधिक माहिती मिळाली होती. गेल्या वर्षभरात अशा प्रकरणांमध्ये ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक स्तरांवर लहान मुलांसाठी समस्या बनलेले ‘चाईल्ड पोर्न मटेरियल’ ‘डिजिटल’ जगाच्या माध्यमातून तयार केले जाते आणि अनेक देशांमध्ये ‘क्लिक’वर वितरित केले जात आहे. लहान मुलांचे अश्लिल व्हिडिओ बनवून ते ‘शेअर’ केल्याप्रकरणी ‘सीबीआय’ने देशातील १४ राज्यांतील ७७ शहरांमध्ये छापे टाकले. त्यामुळे ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चे जाळे १०० देशांमध्ये पसरले असल्याचे समोर आले आहे. किंबहुना, प्रत्येक हातातील ‘स्मार्ट फोन’मध्ये डोकावण्याची सवय मानसिकदृष्ट्या मानवी विचार आणि वर्तनाला अनेक विकारांशी जोडत आहे. बालकांना समाज आणि कुटुंबाची समान जबाबदारी मानणाऱ्या आपल्या देशातही बाललैंगिक अत्याचाराची आकडेवारी भयावह आहे.
 
 
२०२० मध्ये, ‘युएस’मध्येदेखील, अधिकाऱ्यांना बालशोषण सामग्रीचे २० दशलक्ष अहवाल ‘रेकॉर्ड ब्रेक’ केले. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाच्या आयुक्तांकडे बालशोषण सामग्रीशी संबंधित आतापर्यंतचे सर्वाधिक अहवाल होते. इतकेच नाही, तर ऑस्ट्रेलियात बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी अटक आणि आरोप जवळपास ७० टक्क्यांनी वाढले आहेत. या काळात आपल्या देशात बाललैंगिक शोषण सामग्रीच्या शोधात ९५ टक्के वाढ दिसून आली. ‘ऑनलाईन’ सामग्रीपासून प्रेरणा घेऊन किशोरवयीन मुलांनी इतर मुलांचे शारीरिक शोषण केल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. आसामच्या नागाव जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या एका लाजिरवाण्या घटनेत तीन अल्पवयीन मुलांनी एका सहा वर्षांच्या मुलीला मोबाईलवर ‘पोर्न’ न पाहिल्यामुळे बेदम मारहाण केली. या घटनेतील सर्व आरोपींचे वय आठ ते ११ वर्षांच्या दरम्यान आहे. अलीकडच्या वर्षांत, विकृत मानसिकता आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांना ‘स्मार्ट फोन’द्वारे मुठीत असलेल्या विकृत सामग्रीमुळे चालना मिळाली आहे. बहुतेक प्रकरणांची सर्वात दुर्दैवी बाजू अशी की, जे असा मजकूर पाहतात आणि मुलांचे शोषण करतात ते त्यांच्या ओळखीचे असतात. विचार आणि समज या भिन्नतेच्या या युगात, जवळचे लोकही लहान मुलांना बळी बनवण्यात कमी पडत नाहीत. ‘ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनोलॉजी’च्या ताज्या विश्लेषणानुसार, एकूण गुन्हेगारांपैकी ६५ टक्के गुन्हेगार नात्यातील किंवा मित्र वर्गातील आहेत. ‘पार्टनर स्पेक’, कुटुंबातील सदस्यांना (नॉन-क्रिमिलेअर) मदत आणि कायदेशीर मदत पुरवणाऱ्या ‘एनजीओ’ने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, ज्या व्यक्तीने बाल शोषण सामग्रीचा वापर केला त्या व्यक्तीच्या जीवनात ३८ टक्के लोकांना कोणतीही माहिती नव्हती. जागतिक स्तरावरील या समस्येचा सामना एकत्रित प्रयत्नांनी होणे आवश्यक आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@