विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2021   
Total Views |
 
BMC_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकांमध्ये मुंबईतून २ सदस्य निवडले जाणार आहेत. संख्यात्मकदृष्ट्या सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडे आपले उमेदवार निवडणूक येतील इतके आवश्यक ते संख्याबळ आहे. मात्र, अशा स्थितीतही महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सुरुवातीला बिनविरोध होणारी निवडणूक आता चुरशीची बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
मुंबई महापालिकेतून विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून राजहंस सिंह तर शिवसेनेकडून सुनिल शिंदे यांनी अर्ज भरला आहे मात्र काँग्रेसकडे जास्त संख्याबळ नसल्याने काँग्रेस अर्ज भरणार नाही अशी शक्यता होती. मात्र, शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता चुरस निर्माण झाली आहे. विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार असल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे. दरम्यान, मतदानाच्यावेळी नगरसेवक फुटण्याची देखील भीती असल्याने सर्वच राजकीय पक्ष सावध झाले आहेत. मतदान होईपर्यंत नगरसेवकांना सांभाळून ठेवण्याचे आव्हान आता सर्वच राजकीय पक्षांपुढे असणार आहे. विधान परिषदेवर पहिल्याच फेरीत निवडून जाण्यासाठी ७७ मतांचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. यावेळी काँग्रेस उमेदवार अर्ज मागे घेणार का याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.
 
 
पालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना - ९७
भाजप - ८३
काँग्रेस - २९
राष्ट्रवादी - ८
समाजवादी पार्टी - ६
मनसे - १
एम आय एम - २
अ भा से - १
---------------------------
एकूण २२७
@@AUTHORINFO_V1@@