महापालिका स्थायी समितीची बैठक पुन्हा स्थगित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2021   
Total Views |
 
standing comitee_1 &
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बुधवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली बैठक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यात मुंबईच्या देखील एका जागेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असल्यामुळे आचारसंहितेच्या काळात कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याची परवानगी नसते, या निकषाला अनुसरून बुधवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली सभा स्थगित करण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@