२०१४ सालानंतर देशाची संविधानात्मक वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2021   
Total Views |

modi.jpg_1  H x



भारताच्या नागरिकांपासून संविधानाची सुरुवात होते. यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असून कठीण पेचावरही तोडगा सांगितला आहे. भारताचे नागरिक असल्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आपण आपल्या कृतीने देशाला अधिक मजबूत, सशक्त बनवूया. संविधानाने आपल्या सर्वांना एकत्र बांधले आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या विशेषतेवर मत व्यक्त केले आहे. २०१४ साली भारतात सत्तांतर झाले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली. ‘देश नही झुकने दुंगा’ म्हणत खरोखर देशाला विकास आणि यशाच्या देदिप्यमान शिखरावर नेण्यासाठी त्यानंतर अनेक प्रयत्न झाले.








२०१४ सालानंतर भारताची संविधानात्मक वाटचाल कशी होती? धार्मिक, सामाजिक, राजकारण, शिक्षण, सुरक्षा आणि महिला सबलीकरण अशा विविध आयामांमध्ये २०१४ सालानंतर काय स्थित्यंतरे घडली? त्या बदलांचा देशावर आणि समाजावर काय परिणाम झाला? याचा मागोवा घेणे आजच्या ‘संविधान दिन’ विशेषांकामध्ये अगत्याचे ठरावे. कारण, २०१४ सालानंतर देशात आणि समाजात वितुष्ट पडावे म्हणून कटकारस्थाने रचणारे काही मुठभर लोक भयंकर अस्वस्थ झाले. दरवर्षी नित्यनियमाने एक एक विघातक आंदोलन करत ही गँग सक्रिय होण्याची स्वप्न पाहू लागली. देशात घडणार्‍या कोणत्याही घटनेचा संदर्भ संविधानाशी जोडून ‘संविधान खतरे में है’ म्हणत हे टोळके सैरभैर झाले.







संविधानाचे नाव घेऊन हे लोक संविधानाच्या विरोधात कट रचून देशाला अस्थिर करण्याचा डाव आखू लागले. पण, प्रत्यक्षात वास्तव काय आहे? २०१४ नंतर देशाची संविधानात्मक वाटचाल कशी होत आहे? याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या ‘संविधान जागर आणि प्रेरणा’ या विशेषांकात आपण ’२०१४ सालानंतर भारताची संविधानात्मक वाटचाल’ या विषयावर त्या-त्या क्षेत्रातले मान्यवरांचे विचार जाणून घेतले. त्या विचारांवर आधारित हा परिसंवाद. या परिसंवादातून २०१४ साल ते आजतागायत देशाची संविधानात्मक वाटचाल अतिशय यशस्वी आणि प्रेरणादायी आहे हे, निश्चित!





- योगिता साळवी




 
 
@@AUTHORINFO_V1@@