प्रेयसी आणि प्रियकराकडून अल्पवयीन भावा बहिणीचा लैंगिक छळ

कल्याणमधील धक्कादायक प्रकार

    24-Nov-2021
Total Views |

kalyan_1  H x W
कल्याण : लैगिंक अत्याचाराच्या घटना वाढत असताना कल्याणमध्ये एका प्रियकर आणि प्रेयसीने विकृतीचा कळस गाठला आहे. प्रेयसीने १४ वर्षीय मुलांवर सातत्याने लैंगिक अत्याचार केला आहे. तर तिच्या प्रियकराने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. दोन्ही अल्पवयीन भाऊ बहिणीच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिस पुढील तपास करत आहेत. या अल्पवयीन भावा बहिणीची जबानी ऐकून पोलिस सुध्दा हैराण झाले आहे.
 
 
डोंबिवली एका अल्पवयीन तरूणींवर ३३ जणांनी बलात्कार केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती. डोंबिवलीतील ही घटना ताजी असतानाच लैंगिक विकृतीची एक विचित्र घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मुलावर एका २३ वर्षीय तरूणी सातत्याने लैंगिक अत्याचार करत होती. ही तरूणी पिडीत मुलाची नातेवाईक आहे. या आरोपी तरूणीने इतकेच केले नाही , तर तिने तिच्या प्रियकराला मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले.
 
 
आरोपी तरूणी एवढय़ावरच थांबली नाही, तिने मुलाच्या बहिणीला सांगितले की, आपण दोघी मिळून प्रियकरासोबत शय्या करायची. अखेर दोन्ही पिडीत भावा बहिणीनी नातेवाईकांच्या मदतीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले की, आमच्याकडे दोन वेगवेगळ्य़ा तक्रारी दाखल झाल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात योग्य कारवाई करण्यात येणार आहे. पिडीत आणि आरोपी हे नातेवाईक असल्याने एकच खळबळ उडाली आहे.