नांदेड : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांच्या फैरी सुरू असल्या तरीही समीर वानखेडेंची धडक कारवाई सुरूच आहे. एनसीबी मुंबईने नांदेडच्या कंधार जिल्ह्यातील एका ड्रग्ज युनिटचा पर्दाफार्श केला. या कारवाईत सुमारे १.५५ लाखांचे १११ किलो खसखस, १.४ किलो अफू जप्त करण्यात आले आहे. तसेच खसखस दळण्यासाठी वापरलेली २ ग्रायंडिंग मशीन जप्त केले आहे. २२ नोव्हेंबर रोजी एक ई-स्केल नोट मोजण्याचे मशीन जप्त केले, अशी माहिती एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली.