साराची केदारनाथ यात्रा, कट्टरपंथीय म्हणाले 'नाव बदल'

अभिनेत्री सारा आली खान जान्हवी कपूरसोबत करतेय केदारनाथ यात्रा

    02-Nov-2021
Total Views |

Sara_1  H x W:
नवी दिल्ली : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा आली खान ही सध्या केदारनाथ यात्रा करत आहे. तिच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूरदेखील आहे. सध्या त्यांचे सोशल मिडीयावरील फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत. केदारनाथ पोहचून तिने जान्हवीसोबतचे काही फोटो टाकले. साराने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "पुन्हा एकदा तिकडेच, जिथून सुरुवात झाली होती." साराच्या केदारनाथ भेटीचे काहींनी स्वागत केले, तर काही कट्टरपंथीयांनी याचा निषेध नोंदवत तिच्यावर टीका करण्यात आली.
 
 
 
साराने केदारनाथला पुन्हा एकदा भेट दिल्यानंतर तिला मंदिरात बघून कट्टरपंथीयांनी राग व्यक्त केला. एका यूजरने साराला म्हंटले की, अल्लाह तुला मार्गदर्शन करो. तर फैजल नावाच्या व्यक्तीने खालच्या पातळीवर जात म्हंटले आहे की, "काफिर, फक्त नावाची मुस्लिम. तुझ नाव बदल." तर हसीब नावाचा व्यक्ती म्हणतो की, "किमान नाव बदल तुझे, कधीही इस्लामिक पोस्ट टाकली नाहीस, फक्त एवढच टाकते. बुडून मरणे यापेक्षा अधिक चांगले." सारा अली खानवर कट्टरतावाद्यांच्या द्वेषाचा वर्षाव होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा तिच्या हिंदू मंदिरांसोबत किंवा देवतांसोबतच्या फोटोसवर धर्मांध लोकांकडून टीकाटिप्पणी केली आहे. अनेकवेळा तिला तिच्या नावातून अली आणि खान काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.