मुंबई : फराझ नवाब मलिक यांनी वांद्र्यातील २० कोटींचा फ्लॅट ९.९५ कोटींना लाटल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे मोहित कम्बोज यांनी केला आहे. २०२१ रोजी हा व्यवहार झाला असून याबद्दल मलिकांनी खुलासा करावा, असे आव्हान कम्बोज यांनी केले आहे. या इमारतीतील इतर सदनिका ह्या २० कोटींहून अधिक किंमतींना विक्री झाल्या आहेत. तर मलिकांच्या मुलानं घेतलेल्या या सदनिकेची किंमत ९.९५ कोटी इतकीच म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी आहे, असा आरोप कम्बोज यांनी केला आहे.
मलिकांनी बँक घोटाळा केला आहे का ?
२० कोटींची सदनिका ही अर्ध्या किंमतीत कशी मिळाली?, खरेदी करण्यासाठी कुठला पैसा वापरला. बँक घोटाळ्यातून हा पैसा उभा राहिला आहे का?, असा प्रश्न कम्बोज यांनी विचारला आहे. ८१ ऑरंटो या वांद्रे रेक्लमेशन वरील इमारतीत २०५ चौरस मीटरची ही सदनिका तीन कार पार्किंगसाठी जागाही यात सामाविष्ट आहेत.