ही तर मुंबईचे हरवलेले वैभव पुन्हा मिळविण्यासाठीची लढाई : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2021   
Total Views |

Devendra Fadnavis_1  
 
 
 
मुंबई : "राज्य असो की मुंबई महानगरपालिका सध्या राज्यात कार्यरत असलेलेठाकरे सरकार सर्वच पातळ्यांवर फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या कल्याणाकरिता व मुंबईच्या विकासाकरिता आपल्याला मैदानात उतरावेच लागेल. फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातलेली मुंबई महापालिकेची निवडणुक ही मुंबईचे हरवलेले वैभव पुन्हा मिळविण्यासाठीची एका प्रकारे लढाईच आहे," असे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दादर येथील वसंत स्मृती या भाजप कार्यालयात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
 
 
 
उपस्थितांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष राज्यात स्वबळावर भरवशाचे स्वत:चे सरकार स्थापन करून दाखवेल. मुंबईत कोरोना संकट होते, त्या काळातही मुंबई महापालिकेने भ्रष्टाचार करण्यात आपला पहिला क्रमांक पटकाविला होता. महाराष्ट्राच्या जनतेने कोरोना काळातही या सरकार दणकून तोंडावर पडलेले पाहिले आहे. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने स्व: बळाचा नारा दिला होता. तत्कालीन परिस्थितीत शिवसेनेला असा भ्रम झाला होता की महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या बळावर जिंकते. मात्र, शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि शिवसेना तोंडावर पडली, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेवर निशाणा साधला.
 
 
 
जनतेच्या समस्या समजून घेण्याचा मुंबई भाजपचा प्रयत्न
यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ' “सेवा ही समर्पण” या अभियानांतर्गत मुंबई भाजप घरोघरी जाऊन मुंबईतील नागरिकांना मदत करत आहे. यासोबतच मुंबई भाजपने विविध समाजाकरिता चौपाल हे सामाजिक व्यासपीठ आयोजित केले असून त्याच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून- समजून घेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्नही केला आहे. मुंबईतील सर्वसामान्य जनतेला विविध समाजोपयोगी योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी पक्षाने आतापर्यंत प्रत्येक प्रभागात उत्तर भारतीय मोर्चा च्या माध्यमातून पाचशेहून अधिक चौपाल सत्राचे आयोजन केले असून भविष्यात पाचशेहून अधिक चौपाल सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील मराठी माणसांना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यासाठी “मराठी कट्टा” हे व्यासपीठ आयोजित केले जात असून, त्यात नागरिकांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निराकरण केले जाते. त्याचप्रमाणे विविध समाज गटांसाठी अनेक योजना व कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती आ. मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिली.
 
 
 
तरुणांसाठी "करिअर दिशा कार्यक्रमाचे आयोजन
"नवरात्री सणाचे औचित्य साधत मुंबई भाजपतर्फे महिलांचा सन्मान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्या मोहिमे अंतर्गत मुंबई शहरातील महिला स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली. तरूणांच्या भविष्याला योग्य दिशा मिळण्याकरीता “करिअर दिशा” या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते अश्या अनेक योजना मुंबई भाजपा तर्फे आयोजित करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे आ. मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या संबोधनात म्हटले.
दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार अमित साटम, आमदार मिहिर कोटेजा, आमदार पराग अळवणी तसेच मुंबई भाजपाचे सर्व जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंत्री व मंडल अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, उपस्थित होते
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@