गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२१ विजेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2021   
Total Views |

Mumbai BJP_1  H 
 
 
 
मुंबई : मुंबई भाजपतर्फे गणेशोत्सव काळात आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२१ मधील विजेत्यांचा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
 
 
 
गणेशोत्सव काळात संपूर्ण मुंबई मध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली ” गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२१” घरगुती पर्यावरणपूरक, सार्वजनिक मंडळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रत्येक विभागात ३ बक्षिसे व ४ उत्कृष्ट कलाकृती बक्षिसे देण्यात आली. सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष अरूण दळवी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा मुंबई कार्यलयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात गणेशोत्सव सजावट स्पर्धा- २०२१ च्या विजेत्यांना गौरविण्यात आले. बक्षिस समारंभ मुंबई भाजपचे अध्यक्ष व आ. मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्या हस्ते पार पडला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@