जिंकणार तर आम्हीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2021   
Total Views |

Sanjay Raut_1  
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी आदित्यनाथ यांचेच सरकार येणार, असे नुकतेच एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणात जाहीर झाले. पण, छे! छे! असे होणे शक्यच नाही. आमचे साहेबच ‘बेस्ट’ आहेत. तिथे पण आम्हीच जिंकणार! डॉक्टरांना काय कळते? तसेच या वृत्तवाहिन्यांना तरी कुठे काय कळते? आम्हाला ब्रह्मांडाच्या खबरी असतात. त्यामुळे लिहून घ्या, उत्तर प्रदेशमध्येच नव्हे, तर अमेरिकेमध्ये पण निवडणुका झाल्या, तर आम्हीच जिंकणार! उत्तर प्रदेशमध्ये पण वाघ एकला राजा होणार आहे. काय म्हणता, योगी वाघाला खेळवत असतानाचे, बाटलीने दूध पाजत असतानाचे फोटो आहेत. बरं, असू देत. योगींचे फोटो दुसरे काढतात. पण आमचे साहेब तर स्वत: फोटो काढतात. कळले का? स्वत: गाडी चालवतात. स्वत: ‘फेसबुक लाईव्ह’ करतात, समजलं? तुम्ही त्या योगीचे गुणगाण करून आमचे स्वप्न भंग करू नका. साहेब राष्ट्रीयस्तरावर नेता बनणार, असे आम्ही म्हणतो. कारण, ते तिकडे गेले तर इथे राज्यात खुर्ची मोकळी होईल. म्हणजे मला नाही ती खुर्ची पाहिजे, पण मिळाली तरी हरकत नाही. आता साहेबांनी राष्ट्रीय राजकारणात पुढे यायलाच पाहिजे. प. बंगालमध्ये जसे ममता जिंकाव्यात, यासाठी आम्ही माघारी घेत मोठ्या दिलाने ममतांना प. बंगालची सुभेदारी दिली. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पण प्रियांका गांधींना आम्ही मदत करणार. सोनिया मॅडम आणि त्यांच्या मुलांची नेहमी मी स्तुती करतच असतो. हो! शरद पवारांचीही स्तुती करतो. काय म्हणता? तरीही योगी आणि भाजपच जिंकेल. का? तिकडे दंगल करणार्‍यांची घरं जप्त करतात? तिकडची जनता सुरक्षित झाली. गुन्हेगारीला चाप बसला. जनतेला विकासाच्या संधी प्राप्त झाल्या. मग त्यांचे काय कौतुक! आमच्याकडे पण गुन्हेगार घाबरतात. प्रत्यक्ष आमचे मंत्रिमंडळातील मंत्री गुन्हा करून घाबरून फरार होतात. ‘लेटेस्ट’ बातमी, आमचे माजी पोलीस कमिशनर परमवीर सिंह पण आता फरार आहेत. आता तो शरजिल उस्मानीच बघा. आमच्या महाराष्ट्रात आला आणि निघून गेला. सापडला का तो कुणाला? इतके खून, दंगली, बलात्कार आणि आता तर ते क्रूझ पार्टी प्रकरण, गुन्हेगार मिळाले का? ते गुन्हेगार इतके घाबरतात, इतके घाबरतात की, ते फरारच होतात. असे आमचे राज्य. त्यामुळे योगी जिंकणार नाहीत; जिंकणार तर आम्हीच!
 

मणिशंकर नावाची कीड

 
"मुस्लिमांनी हिंदूंवर धर्मांतर करण्यासाठी अत्याचार केले असते, मुलींवर बलात्कार केले असते, तर मग देशात मुस्लीम ७२ टक्के आणि हिंदू २४ टक्के असायला हवेत. मुघल चांगले होते. त्यांनी हिंदूंवर अत्याचार केले नाहीत,” असे अकलेचे तारे तोडले आहेत काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यरने. देशात मुस्लीम ७२ टक्के का नाहीत, असा प्रश्न मणिशंकरला पडला. त्यामुळे मणिशंकर अय्यरसारखी विकृत माणसं या देशाला लागलेली कीड आहेत. ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला आणि हातात वस्तरा’ (मण्इशंकरच्या हातात तलवार शोभत नाही) अशी याची गत! या आधीही मणिशंकर पंतप्रधान मोदींना ‘नीच’ म्हणाला होता. मागे पाकिस्तानमध्ये म्हणाला की, “मी भारतामध्ये खूप निराश आहे.” इतकेच काय तर ‘एक शाम बाबर के नाम’ या एका कार्यक्रमात तो म्हणाला की, ”दशरथच्या महालात दहा हजार खोल्या होत्या. त्यापैकी कोणत्या खोलीमध्ये रामाचा जन्म झाला हे माहिती नसल्यामुळे हे लोक बाबरी मशीद तोडून रामाचे मंदिर बनवू इच्छितात.” या सगळ्या बोलण्याचे परिणाम या मणिशंकरवर प्रत्यक्ष झाले नाहीत. काही काळ त्याला त्याच्या काँग्रेस पक्षाने निलंबित केले. पण, पेकाट मोडलेल्या कुत्र्याला कुठेच आसरा मिळाला नाही की तो लाळ गाळत हाडूक टाकणार्‍या मालकाकडे येतो, तसाच हा पुन्हा पुन्हा त्याच्या पक्षात सामील झाला. बाबर असो की, औरंगजेब की टिपू या सगळ्यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यांच्यामुळेच भारतात महिलांवर पडदा पद्धती लादली गेली. बारा बलुतेदार आणि अलुतेदार पद्धत हिंदू समाजात होती. अलुतेदार समाज मुघलांच्या काळात देशोधडीला लागला. हाती देव आणि मनात धर्म घेऊन हा समाज अक्षरश: परांगदा जगणे जगला. हे सगळे कुणामुळे? तर केवळ मुघलांमुळे! मणिशंकर अय्यरसारखे लोक केवळ जी हुजरी करत सत्तापद भोगतात. ‘हर्बल’ वनस्पतीचा शोध आता नवाब मलिक आणि शरद पवारांनी लावला. पण, मणिशंकर अय्यरसारखे लोक हीच ‘हर्बल’ वनस्पती घेऊनच आधीपासून बरळत असावेत, याची दाट शक्यता आहे. पण छे! ‘हर्बल’ वनस्पतीपेक्षाही हिंदूद्वेषाची भयंकर नशा याच्यासारख्या वृत्तीच्या रक्तात भिनली आहे. तो द्वेष चघळत चघळत, तर यांनी इतके वर्षे देशावर त्यापुढे ‘हर्बल’ वनस्पती कीस झाड की पत्ती!
 
@@AUTHORINFO_V1@@