कल्याणच्या बिर्ला शाळेबाहेर फी वाढीसंदर्भात पालकांचे आंदोलन

फी वाढ कायदेशीर बिर्ला शाळा व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण

    17-Nov-2021
Total Views |


birla school news_1 

कल्याण : कल्याणमधील प्रसिध्द असलेल्या बिर्ला शाळेने यंदा फीमध्ये वीस टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत पालकांनी शाळेच्या बाहेर पालकांनी काळ्य़ा फिती बांधून आंदोलन केले आहे. पालकांनी शाळेबाहेरच ठिय्या आंदोलन करत शाळा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

शाळेतील पालकांनी फी वाढ मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. या आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने आंदोलनकत्र्या पालकांना चर्चेसाठी बोलावून घेतले. पालकांशी झालेल्या चर्चेनंतर सुध्दा शाळेने फी वाढ मागे घेण्यास नकार दिला असल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे या पुढील काळात सुध्दा आंदोलन सुरूच राहणार आहे यावर पालक ठाम आहेत. शाळेच्या या निणर्या विरोधात शिक्षण मंत्र्याकडे आणि न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

पालक शिक्षक असोसिएशनचे उपाध्यक्ष आश्विन ठक्कर म्हणाले, ज्या पालकांनी फी भरली नाही त्यांनी फी भरावी. तसेच ज्या पालकांची खरचं आर्थिक परिस्थिती चांगली नसेल त्यांनी शाळेशी संपर्क करावा. त्यांच्या बाबत संवाद साधून निर्णय घेण्यात येईल. सगळ्य़ा मुलांची फी कमी करणे शक्य नाही. मागच्या बैठकीत 3600 विद्याथ्र्यापैकी 3200 विद्याथ्र्यानी फी भरली आहे. चारशे विद्याथ्र्याची फी बाकी आहे. सरकारचा 15 टक्के फी कमी करावी. त्यासाठी उच्च न्यायालयात निकाल लागणो बाकी आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शाळा फी परत दयाला तयार आहे. उच्च न्यायालय काय निर्णय देईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल.

दरम्यान शाळा प्रशासनाने कोविड काळात 2019 पासून आम्ही कोणाताही फी वाढ केली नव्हती. यंदा नियमानुसार फी वाढ केली आहे. पालकांना चार ते सहा टप्प्यात फी भरण्याची मुभा दिला आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती फी भरण्याची नाही त्याना फी मध्ये सवलत देण्यात येईल . फी वाढी संदर्भात न्यायालयात प्रकरण असून न्यायालयाच्या जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असल्याचे शाळा व्यवस्थापनांकडून सांगण्यात आले आहे.
----------------------------------------