'मी त्या भारतातून येतो...' वीर दासच्या कवितेने नवा वाद

वीर दासच्या कवितेमुळे भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार ; सोशल मिडीयावर टीका

    16-Nov-2021
Total Views |

Vir Das_1  H x
 
 
नवी दिल्ली : भारताचा विनोदवीर वीर दासने वॉशिंग्टन डीसीमध्ये सादर केलेल्या कवितेमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. 'टू इंडियन्स' (दोन भारतीय) असे या कवितेचे शीर्षक असून या कवितेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप होत आहे. या कवितेत त्याने भारताच्या दोन विविध रुपांचे वर्णन केले. मात्र या कवितेतील काही ओळींवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
 
 
 
 
वीर दासने हा व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केला असून सहा मिनिटांच्या या कवितेत वीर दासने भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. "मी अशा भारतातून आलो आहे, जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो," या कवितेतील ओळींवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. यावरून आता भारतात तीव्र प्रतिक्रिया येत आहे. मुंबई पोलिसांकडे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
 
 
 
 
 
मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि भाजप-महाराष्ट्राचे कायदेशीर सल्लागार अॅड. आशुतोष जे दुबे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर वीर दासविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची प्रत शेअर केली आहे. तर, भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे की, "मी त्या भारतातून आलो आहे, जिथे ११० कोटी लसीकरण केले गेले जो जगातील सर्वाधिक लसीकरणाचा विक्रम आहे. मी त्या भारतातून आलो आहे, ज्यात इस्रो जगात ५व्या क्रमांकावर आहे. मी भारतातून आलो आहे जिथे महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जाते. भारताची बदनामी करणारे वीर दाससारखे लोक देशाला काळीमा फासणारे, त्यांच्यावर बहिष्कार टाका!"