'उडता महाराष्ट्र' कोण तयार करतंय? मोहित कंबोज यांची टीका

एनसीबी पथकाने जळगावात १५०० किलो गांजा पकडल्याने भाजप नेते मोहित कंबोज यांची टीका

    15-Nov-2021
Total Views |

ganja_1  H x W:



मुंबई
: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत १५०० किलो गांजा जप्त केला. यामध्ये एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आली आहेत. दोघा संशयित तस्करांना देखील या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाचे विशाखापट्टणम कनेक्शन समोर आले आहे. यावरून 'उडता महाराष्ट्र कोण तयार करतंय?' अशी टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे.
 
 
 
भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे की, "उडता महाराष्ट्र कोण बनवत आहे? कोण आहे गांजा किंग? ही हर्बल वनस्पति नक्की कोणाची?" असे म्हणत अनेक प्रश्न उभे केले आहेत. पुढे त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना प्रश्न टोमणा मारला आहे की, "एनसीबीच्या या रेडबद्दलही, नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार का? की तुम्हाला फक्त आर्यन खानची चिंता आहे?" असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.
 
 
 
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे एनसीबीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने एक ट्रक अडवून त्यात ट्रकमधून वाहतूक करण्यात येणारी १५०० किलो गांजाची पोती जप्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. यात दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही संशयित आरोपी हे आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.