बालिश बहुमूर्खात बडबडला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2021   
Total Views |

hindu.jpg_1  H


हिंदुत्व म्हणजे मुस्लीम आणि शिखांना मारहाण करणे,” असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. हिंदुत्वाची व्याख्या राहुलसारखी व्यक्ती करणार का? राहुल गांधी सोईनुसार आपला धर्म बदलत असतात. निवडणूक आली की ते हिंदू होतात. मात्र, इतर वेळी त्यांच्या आतल्या मनातला जपलेला आणि लपलेल्या धर्माचा पुळका आपोआप बाहेर येतो. मग त्यांना भगवा दहशवतवाद वाटतो.





 प्रखर तेजोमय हिंदुत्व जपणार्‍या सावरकरांबद्दल आणि रा. स्व. संघाबद्दल तिरस्कार वाटतो. हिंदुत्व म्हणजे काय हे २०१४ सालीच जनतेने राहुल आणि त्यांच्या ढोंगी विचारसरणीच्या दुतोंडी पक्षास दाखवून दिले आहे. पुढे २०१९ सालीही आणखी चांगल्या प्रकारे पुन्हा राहुल गांधी यांना जनतेने हिंदुत्व म्हणजे काय दाखवून दिले. पुढे राम मंदिर निर्णय, ‘तिहेरी तलाक कायदा’, ‘सीएए’, ‘३७०’ कलम हटवणे यातूनही राहूलसारख्यांना हिंदुत्व चांगलेच दिसले.
असो, हिंदुत्वाची असली घाणेरडी व्याख्या करताना राहुल यांनी देशातल्या कोट्यवधी बहुसंख्य हिंदूंचा अपमान केला आहे. आता आलूतून सोना काढणारे राहुल गांधी किंवा विश्वेश्वरय्या, पिच्चहत्तर वगैरेबद्दलचे राहुल यांचे ज्ञान ज्यांनी अनुभवले त्यांना वाटेल की, राहुल असे म्हटले त्यात काय इतके? पण तसे नाही. राहुल जे म्हणतात, त्यात १०० टक्के राजकारण असते आणि आहे. हिंदुत्व म्हणजे मुस्लीम आणि शिखांना मारहाण असे म्हणताना त्यांनी हिंदू आणि मुस्लीम हे तर दोन टोकाचे मतभेद असलेले गट आहेतच. पण हिंदू आणि शीख हेसुद्धा दोन भिन्न टोकांचे मतभेद असलेले गट आहेत हे मांडले आहे. याच विधानात त्यांनी शीख आणि मुस्लीम हे दोन गट भारतात अल्पसंख्याक असून हिंदू त्यांना मारहाण करतात, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू समाजाच्या एकतेवर इतका पद्धतशीरपणे आघात करण्याचा प्रयत्न राहुल अतिशय धूर्तपणे करतात. अर्थात, इटली देशातील मातेच्या पुत्राला भारतीय संस्कृती आणि इतिहास रोमच्या संस्कृतीपेक्षा जास्त माहिती नसावाच. तसा इतिहास माहिती असता, तर राहुल यांची हिंदू आणि शीख यांना एकमेकांचे शत्रू दाखवण्याची हिंमत झाली नसती. संसदेत पंतप्रधान मोदींनी ‘लेट करंट ट्यूबलाईट’ हा शब्द वापरला होता. तो अगदी बरोबर आहे. सत्ता मिळवण्यासाठी बालिश बहुमूर्खात बडबडला, असेच काहीसे यांचे असते.
एसटी कर्मचारी-खंत ना खेद
जय राऊत यांनी एसटी कर्मचार्‍यांना सल्ला दिला, ‘आहे त्यात समाधानी राहा.’ खरेच संजय राऊत यांना हा अधिकार कोणी दिला? संघटनात्मक पातळीवर त्यांची अहिंदुत्ववादी राजकीय आघाडीबिघाडी जाऊ द्या, पण ते ज्यांची चाकरी वगैरे करतात, ते त्यांचे साहेब काका आणि मॅडम तरी आहे त्यात समाधानी आहेत का? वैयक्तिक पातळीवर संजय राऊत स्वत:तरी आहे त्यात समाधानी आहेत का? दुसर्‍यांना सल्ला देणे फार सोपे असते. एसटी कर्मचार्‍यांना सल्ला देताना अमरावती, नांदेडमध्ये आणि मुंबईच्या गल्ल्यामध्येही हिंदूविरोधात हिंसा करणार्‍यांना संजय यांनी काही सल्ला दिला का?


संजय राऊत यांना आत्महत्या करणार्‍या त्या एसटी बांधवांची हतबलता, वेदना समजण्याचे कारणच नाही. कारण, आता ते आणि त्यांचे सर्वेसर्वा सामान्य जनतेपासून कोसो दूर गेले आहेत. शब्दांचे बुडबुडे उडवायचे बस इतकेच काम यांना राहिले आहे. भाजप एसटी कामगारांसोबत आहे, तर या महाशयांचे म्हणणे की, “एसटी कर्मचार्‍यांचा घामाचा वास भाजपवाल्यांना येतो म्हणून एसटी कर्मचार्‍यांनी काम करू नये यासाठी भाजप संपाला पाठिंबा देते. ” अरेरे सदरबिदर लिहिणार्‍या माणसाने इतके पाणचट आणि निरर्थक बोलावे? तेही ज्या विषयात एसटी कर्मचारी स्वत:हून संपाला तयार होतो त्या विषयात? एसटी संपाबाबत राऊत कायद्याचाही दाखला देतात. पण मग दिल्लीतले शेतकर्‍यांच्या रूपातले ते समाजविघातक आंदोलन काय कायद्याच्या चौकटीतले होते? ‘आझाद काश्मीर’चा फलक मुंबईत झळकवणार्‍या मुलीचे समर्थन करणे कायद्याच्या चौकटीत होते? आताही ‘जय भीम’ चित्रपटामधील ‘जस्टीस चंद्रू’ याबद्दल लिहिताना संजय राऊत यांनी फादर स्टॅन, सुधा भारद्वाज, वरवरा राव याबद्दल अकलेचे तारे तोडलेत. या सगळ्यांवर कायद्याने कारवाई झाली आहे. पण या असल्या लोकांचे समर्थन राऊत करतात? संजय यांच्या सर्वच भूमिका-विधान आताशा आझादी वगैरेचे थोतांड माजवणार्‍या तथाकथित संशयास्पद पुरोगामी आणि ‘सेक्युलॅरिस्ट’ जमातीचे नेतृत्व करत असतात. सुधा भारद्वाज, फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव आणि नवलखांचा इतका पुळका का? की कायद्यापेक्षा संजय राऊत मोठे आहेत? तसेच नक्षली समर्थक असलेल्या देशविघातक लोकांचे जगणे हे एसटी कर्मचार्‍यांपेक्षा महत्त्वाचे आहे का?



@@AUTHORINFO_V1@@