
आ. नितेश राणेंचा आझाद मैदानावरून महाविकास आघाडीवर प्रहार
मुंबई: "आपण जे आंदोलन करत आहात मला आश्चर्य वाटत, मुख्यमंत्र्याच्या मानेची शस्त्रक्रिया झाली. ते बरे असल्याची माहिती आहे. आमच्याही शुभेच्छा आहे. मात्र, डॉक्टरांनी एक संशोधन केलंय नेमक या माणसाला कणा आहे का पाहायला पाहिजे. कणा असलेला माणूस सामान्य माणसासोबत असं वर्तन करणार नाही," असा खोचक टोला भाजप आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. आमदार नितेश राणेंनी शुक्रवारी आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आलोयं, भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे. सदाभाऊ खोत यांना फार मच्छर चावतात असा इंटरव्यू चालवला. सदाभाऊ खोतांना मला सांगायचंय दोन तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, अनिल परब यांच्या घरी ते सोडायचे आहेत. जेणेकरुन मच्छर कसे चावतात हे त्या कारट्याला कळेल.तो मूळ तसा आमच्या सिंधुदुर्गचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे, पण आमच्या मातीतून असा कारटा कसा निघाला हा संशोधनाचा विषय आहे, असा टोलाही नितेश राणेंनी अनिल परब यांना लगावला.
हे गेंड्याच्या कातडीचे लोक
पुढे ते म्हणतात, आपण जे आंदोलन करत आहात मला आश्चर्य वाटत. मुख्यमंत्र्याच्या मानेची शस्त्रक्रिया झाली. ते बरे असल्याची माहिती आहे. आमच्याही शुभेच्छा आहे. मात्र, डॉक्टरांनी एक संशोधन केलंय नेमकं या माणसाला कणा दिला आहे का?.कारण कणा असलेला माणूस सामान्य माणसासोबत असं वर्तन करणार नाही. तुम्हाला एवढे दिवस इथं बसवलं आहे. एक तरी आमदार, पालकमंत्री, मंत्री,मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी इथं येत नाही. शाहरुखचा मुलगा जेलमध्ये होता त्यावेळी त्यांना झोप येत नव्हती. आमच्या राष्ट्रवादीच्या ताई आहेत, त्या ताई म्हणाल्या आर्यन खान जेलमध्ये असल्यानं त्याच्या आईला काय वेदना होत असतील ते आई म्हणून कळतंय. ताई असंख्य महिला इथं बसल्यात त्यांच्या आईला काय वाटत असेल याचा ताईला वाईट वाटत नाही. हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत, असा जोरदार निशाणा नितेश राणेंनी महाविकास आघडीला लगावला.
दिवाकर रावते एमआयएममध्ये गेलेत का?
पुढे ते म्हणतात, या लोकांना विलनीकरण का नकोय, याचं कारण आहे. वाय फाय असो, टायरच्या किमती यामध्ये कमिशन कसं खाणार?,शासनामध्ये विलिनीकरण झालं तर अनिल परब कशी वसुली करणार, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. आमच्या भगिनी परिवहन मंत्र्यांना भेट पाठवणार आहेत, मी त्यांना सांगतो बदाम पाठवा. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. परिवहन मंत्री विचारतात तुमच्या काळात विलिनीकरण का केलं नाही. तुमच्या रावतेंना विलिनीकरण का केलं नाही ते विचारलं पाहिजे. दिवाकर रावते एमआयएममध्ये गेलेत का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुलीमध्ये व्यस्त असल्यानं दिवाकर रावते यांच्याशी बोलायला यांच्याकडे वेळ नाही, असेही राणे म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये
पुढे कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून निशाणा साधताना ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहात हे चुकीचं आहे. एसटी कर्मचारी आत्महत्या करतोय पण पुढच्या लोकांना आत्महत्या करायला लावूया. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये, असं आवाहन नितेश राणे यांनी केला. तुम्ही आत्महत्या करता म्हणजे आमच्यावर विश्वास नाही, असं होतं. तुम्ही आत्महत्या करु नका असं आवाहन नितेश राणे म्हणाले. राज्य सरकारला झोपावयचंय, असं नितेश राणे म्हणाले. कोरोनाच्या काळात तुमचा मुख्यमंत्री घरात बसला होता त्यावेळी एसटी कर्मचारी राज्यभर फिरत होते, असं नितेश राणे म्हणाले.