पुणे : गरज ही जशी शोधाची जननी आहे तशीच ती उपक्रमांची पण जननी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे भाजप अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. ते अंकुर प्रतिष्ठानच्या 'देणे समाजाचे समाजासाठी' या कार्यक्रमाच्या १३व्या वर्षीच्या उपक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अंकूर प्रतिष्ठान चे अध्यक्ष कुलदीप सावळेकर व स्विकृत नगरसेविका वकील सौ मीताली कुलदीप सावळेकर यांच्या मार्फत गेली १३ वर्षे सातत्याने चालणाऱ्या अंकूर प्रतिष्ठान च्या देणे समाजाचे समाजासाठीचा १३व्या वर्षीच्या उपक्रमात गरजू व्यक्तींना आणि संस्थांना वस्तू आणि कपडे प्रदान करण्याचा कार्यक्रम भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यामुळे कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेक गरजू व्यक्तींची आणि संस्थांची दिवाळी गोड झाली असे म्हणावयास हरकत नाही.
या उपक्रमात यावर्षी १७०० हून अधिक नागरिकांनी त्यांच्या घरच्या जुन्या परंतु वापरण्यायोग्य वस्तू आणि कपडे अंकुर संस्थेकडे आणून दिल्या. कोरोना महामारीच्या काळात अनेकांना आर्थिक मदत देणे शक्य नव्हते परंतु वस्तु स्वरूपाची मदत देणे सहज शक्य होते त्यामुळे अनेक गरजू संस्थांना आणि व्यक्तींना त्याचा उपयोग झाला. या वेळी कार्यक्रमाची सुरवात मधुकर शिधये यांच्या पांचजन्य शंख- नाद पथकाने तसेच २ वर्षाच्या अनय इनामदारने शंख वादन करून चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताने झाली. या वेळी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अंकुर प्रतिष्ठान च्या उपक्रमाची माहिती घेतली,पाहणी केली,गरजू संस्थांची विस्तृत माहिती घेऊन त्यांचे कार्यक्षेत्र काय आहे आणि कामाचे स्वरूप कसे असते ह्याची पण माहिती घेतली. सदर उपक्रमाचे व त्याच्या वेगळेपणाचे चंद्रकांत पाटील यांनी कौतुक तर केलेच व अश्या प्रकारचे उपक्रम अधिक प्रमाणात व्हायला हवे असेही सांगितले. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि ," गेल्यावर्षी जेव्हा मला या उपक्रमाची माहिती मिळाली तेव्हा कोरोनाचे संकट असल्यामुळे लोकांना सहज मदत करणे जमणार न्हवते.
मात्र या उपक्रमाची यावर्षी सर्वाधिक आवश्यकता असल्यामुळे कोणताही खंड पडू न देता सर्व खबरदारी घेऊन हा उपक्रम राबवावा असा मी आग्रह धरला आणि या वर्षी हा उपक्रम यशस्वी पणे राबविला गेला. तसेच यावर्षी सदर उपक्रमात मी माझ्या संपर्कातील काही नवीन मंडळींना देखील जोडून दिले आहे व त्यापैंकी काहींनी वस्तू रूपात तर काहींनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. रविवार पेठेतील एका कापड उद्योजकाने ११ पोती नवे कपडे दिले ज्यामुळे गरजू संस्थांमधील मुलांच्या चेह-यावर निश्चितपणे एक हास्य उमलणार आहे ; ज्यायोगे आपल्यालाही एक समाधान लाभणार आहे. हा खऱ्या अर्थाने समाजाच्या योगदानातून सर्वांच्या सहभागातून अत्यंत उपयुक्त व समाधान देणारा उपक्रम सलग १३ वर्षे करणा-या अंकूर प्रतिष्ठानच्या सर्व टीमचे व आमच्या भाजपाच्या अनेक वर्ष सक्रीय सभासद असलेल्या व ज्यांची ही मूळ संकल्पना आहे त्या श्री कुलदीप सावळेकर व स्विकृत नगरसेविका अँड् सौ मीताली कुलदीप सावळेकर यांचे मी मनापासून कौतुक करतो''. सदर उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील बीड येथील शांतीवन, पेण मधील सर्वोदय, अहमदनगर येथील सावली, राशीन येथील संकल्प संस्था, बीड येथील आजोळ, तसेच भूम, सोलापूर, पुणे, सहकारनगर, कर्वेनगर इत्यादी सर्व ठकाणांच्या मिळून सुमारे ४० हून अधिक संस्थांना यावर्षी वर्षभर पुरेल एवढी मदत करण्यात आली आहे . यावेळी या उपक्रमास नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, रा.स्व.संघाचे कर्वेनगर चे नगरसंघचालक उल्हास जोशी, संदीप खर्डेकर, राघवेंद्र मानकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी, विठ्ठल मानकर, समीर ताडे, वकील प्राची बगाटे, निलेश गरूडकर, बाळासाहेब धनवे, राजेंद्र येडे, सुनील होलबोले, अनुराधा येडके, हर्षदा फरांदे, सौरभ अथनिकर, गिरीष भेलके, दिनेश माथवड, दीपक पवार, तसेच भाजपाचे अनेक शहर, मंडल प्रभाग कार्यकर्ते व पदाधिकारी आणि महाराष्ट्र भरातून विविध संस्थांचे प्रतिनिधी,कर्वेनगर परिसरातील नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील सौ मीताली कुलदीप सावळेकर यांनी केले; त्याचवेळी त्यांनी या उपक्रमाची जन्मकथा सांगितली आणि या उपक्रमाचा उद्देश, उपयुक्तता, वैशिष्ट्य व लोकांचा वाढता सहभाग याविषयीही माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप सावळेकर यांनी केले तर आभार निलेश गरूडकर यांनी मानले.