मोहित कंबोज यांचे नवाब मलिकांना खुले आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2021   
Total Views |
 
Mohit-Kamboj-and-nawab-ma
 
 
 
मुंबई : मागील एक महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सुरु असलेल्या नूर कुस्तीच्या डावात गुरुवारी आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चर्चेसाठी खुले आव्हान दिले आहे. कंबोज यांनी गुरुवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी ट्विट करत मलिक यांना चर्चेसाठी आव्हान दिले आहे.
आपल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणाले की, नवाब मलिक यांनी समोरासमोर येऊन माझ्याशी चर्चा करावी. तथ्य आणि पुराव्याच्या आधारांवरच आपण ही चर्चा करूया. चर्चेसाठी वेळ, दिनांक सर्व तुम्ही ठरवा,असे कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
 
 
 
मागील महिनाभरापासून रंगलेल्या आर्यन खान ड्रग प्रकरणावरून सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात वाद पेटला होता. मात्र मागील काही आठवड्यांपासून या वादाला वेगळे वळण लागले आणि हा वाद नव्याने नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यात रंगायला सुरुवात झाली होती. नवाब मालिकांनी समीर यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यावर मोहित कम्बोज यांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्याचा सपाट लावला आहे. मागील आठवड्यात मोहित कम्बोज यांनी पत्रकार परिषद घेवून नवाब मलिक यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते,नवाब यांचा अंडरवल्डशी संबध आहे, असा धक्कादायक आरोप मोहित यांनी मलिकांवर केला होता. त्यामुळे मोहित कंबोज यांनी दिलेल्या आव्हानाला मलिक प्रतिआव्हान देतात की माघार घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@