मुंबईत ३४७ कोरोनाबाधितांची नोंद ;

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2021   
Total Views |
 
corona_1  H x W
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार बुधवार, दि. १० नोव्हेंबर रोजी मुंबई शहरात ३४७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७,३६,९४७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
 
बुधवारी मुंबईत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २७६१ इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर २१९४ दिवसांवर गेला आहे. शहरातील एकूण १५ इमारती पालिका प्रशासनातर्फे सीलबंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@